अ‍ॅपशहर

चंद्रपुरात 'अग्निवर्षाव!', मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद

देशातील उष्णतेच्या लाटेत रविवारी राजधानी दिल्लीचा परिसर होरपळला. दिल्ली परिसरात रविवारी तापमान ४९.२ अंश सेल्सिअसवर गेले. देशभरात सर्वत्र उष्णतेची लाट उसळली असतानाच रविवारी चंद्रपुरात या मोसमातील सर्वाधिक म्हणजे ४६.८ इतक्या तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ ब्रम्हपुरी येथे ४५.९, वर्ध्यात ४५.६ तर त्या खालोखाल नागपुरात ४५.१ अंश तापमानाची नोंद झाली.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 16 May 2022, 10:09 am
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : देशभरात सर्वत्र उष्णतेची लाट उसळली असतानाच रविवारी चंद्रपुरात या मोसमातील ( chandrapur highest temperature ) सर्वाधिक म्हणजे ४६.८ इतक्या तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ ब्रम्हपुरी येथे ४५.९, वर्ध्यात ४५.६ तर त्या खालोखाल नागपुरात ४५.१ अंश तापमानाची नोंद झाली. यापूर्वी, मागील महिन्यात ३० एप्रिल रोजी चंद्रपूरमध्ये मोसमातील सर्वाधिक ४६.६ इतके तापमान नोंदवले गेले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chandrapur heat wave temperature update
चंद्रपुरात 'अग्निवर्षाव!', मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद


विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानामध्येही वाढ झाली आहे. रविवारी वर्ध्यात ३१.८, चंद्रपुरात ३१.६, ब्रम्हपुरी ३१.६, अकोला ३१.५, अमरावती ३१.१, तर नागपुरात ३०.५ अंश किमान तापमान नोंदवले गेले.

सूर्य मावळल्यानंतरही उष्ण वारे कायम राहत असल्याने रस्त्यांवरील आणि बाजारपेठांमधील गर्दी तुलनेने कमी झाली आहे. या वाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी अनेक नागरिक रात्रीसुद्धा कानाला बांधून फिरत असल्याचे दिसून येते. दरम्यान, आणखी काही दिवस उष्णतेची ही लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

चंद्रपूरसाठी अतिशय महत्त्वाची बातमी; जिल्हा बँकेच्या नोकरभरतीला अखेर स्थगिती

महत्वाचे लेख