अ‍ॅपशहर

कोंबड्यांवर सट्ट्याची पोलिसांना खबर, जागेवर १२ जणांना पकडलं, लाखाचा मुद्देमाल ताब्यात

चंद्रपुरात कोंबड्यांची पैज लावणं चांगलंच महागात पडलंय. कोंबड्यावर पैज लावणाऱ्या बारा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एक लाखाचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 9 Jan 2022, 8:24 pm
चंद्रपूर : चंद्रपुरात कोंबड्यांची पैज लावणं चांगलंच महागात पडलंय. कोंबड्यावर पैज लावणाऱ्या बारा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एक लाखाचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Chandrapur Police arrested 12 people for betting on chickens


वैनगंगा नदीच्या पात्रात कोंबड्यांचा बाजार सुरु होता. अशात पोलिसांनी धाड टाकून कोंबड्यांवर पैज लावणाऱ्या बारा जणांना ताब्यात घेतले तसंच त्यांच्याकडून एक लाखाचा मुद्देमालही जप्त केला. ही कारवाई ब्रम्हपुरी तालुक्यातील भालेश्वर येथे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी तालुक्यात येणाऱ्या भालेश्वर येथील वैनगंगेचा नदी पात्रात अवैध कोंबड बाजार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी धाड टाकली असता, पैज लावणारे बारा जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. घटनास्थळावरुन सहा जखमी कोंबडे, लढाईसाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी कात्या, दुचाकी, सायकल, मोबाईल असा एक लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज