अ‍ॅपशहर

तलवारी बरोबर उद्योगही आणा; वडेट्टीवार यांचा मुनगंटीवार यांना खोचक सल्ला

Chandrapur News: शिवरायांची 'जगदंबा तलवार' परत मिळवण्यासाठी राज्य सरकार ठोस पावलं उचलणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले होते. यावर काँग्रेस आमदार वडेट्टीवार पाहा काय म्हणालेत.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Nov 2022, 12:44 pm
चंद्रपूर: छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहेत. शिवरायांची 'जगदंबा तलवार' परत मिळवण्यासाठी सरकार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधणार आहेत. भाजपचे नेते व राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुनगंटीवार यांच्या या भूमिकेवर माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी मात्र चिमटे काढले आहेत. तलवारीसोबत उद्योगही आणा असा खोचक सल्ला वडेट्टीवारांनी दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Vijay Wadettiwar


''जगदंबा तलवार' ही आमच्या अस्मितेचं प्रतिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झाली आहे. ही तलवार महाराष्ट्राला परत करावी, असं पत्र आम्ही केंद्राला पाठवलं आहे. तसंच, ब्रिटनच्या पंतप्रधानांनाही आम्ही विनंती करत आहोत,' असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

वाचा- दिग्गज खेळाडू निवृत्ती घेणार, टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार; सुनील गावस्करांनी थेट...

जगदंबा तलवार परत आणण्याचा मुनगंटीवार यांचा विधानावर वडेट्टीवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.वडेट्टीवार म्हणाले, जगदंबा तलवार परत येत असेल तर आम्हालाही आनंद होईल. मात्र महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेल्याने हजारो बेरोजगारांचे हातचे काम गेलं. महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाल. तलवार आणत असताना तलवारी सोबत उद्योगही आणा. बेरोजगाराच्या हातांना काम मिळणं हे ही तेवढेच महत्त्वाचा आहे.

वाचा- वर्ल्डकप जिंकण्याचा विचार देखील करू नका; इंग्लंडविरुद्धच्या रेकॉर्डने बाबरने डोक्याला हात लावला

उद्योग गेलेत, रोजगार बुडालेत, महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले. तो विषय बाजूला ठेवून केवळ भावनेचे राजकारण करण्यासाठी जगदंबा तलवारीच्या विषय पुढे केला. तुमचे राजकारण महाराष्ट्रातील तरुणांना कळत आहे. तलवारी सोबत उद्योग जर आणलेत तर जनता तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवील, असे वडेट्टीवार म्हणाले.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज