अ‍ॅपशहर

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली 'लालपरी'; ७४ वर्षानंतर बस आल्याने गावकरी आनंदी, पण...

गावात बस आल्याने अख्या गावात आनंदाला उधाण आलं होतं. आता चार किमी अंतर पैदल जावं लागणार नाही. याच लालपरीत बसून भाऊरायाला ओवाळणीसाठी जावू, असं स्वप्नही बहिणींनी रंगविलं.

Maharashtra Times 9 Nov 2021, 12:52 pm
चंद्रपूर : " ती " गावात आली..तब्बल ७४ वर्षानंतर! तिच्या येण्याने गावात आनंदाचे उधाण आले. तिला बघण्यासाठी गाव जमला. हारतूरे, पुजापाठाने तिचे स्वागत केले. मात्र, ती एका दिवसाचीच पाहुणी ठरली. ती परत केव्हा येणार ? याची आता गावकरी वाट बघत आहेत. लालपरीकडे डोळे लावून बसलेलं हे गाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील लिखितवाडा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम st bus strike (2)


चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका मागासपणाची चादर ओढून कसाबसा उभा आहे. याच तालुक्याती लिखीतवाडा हे छोटेसे गाव. अंधारी नदीचा काठावर वसलेल्या या गावात अद्यापही मुलभुत सूविधा पोहचल्या नाहीत. अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत.
आता मी ढवळाढवळ करु का?, उदयनराजेंच्या थेट सवालामुळे राजकारणात खळबळ
स्वातंत्र्याचे ७४ वर्ष उलटले. मात्र, गावात लालपरी पोहचली नव्हती. एसटीसाठी गावकऱ्यांना तब्बल चार किमी लांब असलेला वढोली गाव गाठावे लागत असे. ग्रामपंचायतेचा पधाधिकार्यांनी गावात बस फेरी सूरू करण्याची मागणी लावून धरली. मागणीला यश मिळालं अन् पहिल्यांदाच लालपरी गावात आली. लालपरीचा स्वागतासाठी गाव एकवटला. गावकऱ्यांनी लालपरीला हार घालून सजवलं, आरती ओवाळली अन् वाहक, चालकाचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत केले.

गावात बस आल्याने अख्या गावात आनंदाला उधाण आलं होतं. आता चार किमी अंतर पैदल जावं लागणार नाही. याच लालपरीत बसून भाऊरायाला ओवाळणीसाठी जावू, असं स्वप्नही बहिणींनी रंगविलं. मात्र, गावकऱ्यांचा हा आनंद क्षणिक ठरला. ST कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. लालपरीची चाके थांबलीत. संप केव्हा थांबणार आणि लालपरी पुन्हा एकदा गावात केव्हा येणार याची आतुरतेने लिखितवाडावासीय वाट बघत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज