अ‍ॅपशहर

'नो कास्ट ,नो रिलीजन'; जात, धर्ममुक्तीचं महाराष्ट्रात केवळ एकाच महिलेकडे असणार प्रमाणपत्र

चंद्रपूरातून एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. चंद्रपूरच्या रहिवासी असलेल्या अ‍ॅड. प्रितीशा शाह ह्या देशातील दुसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला असणार आहेत. ज्यांच्याकडे 'नो कास्ट ,नो रिलीजन' म्हणजे जात, धर्ममुक्तीचं प्रमाणपत्र असणार आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byप्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 May 2022, 10:28 pm
चंद्रपूर : 'तु हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा', ब्लॅक अँन्ड व्हाईट सिनेमातील हे गाणं. देशातील सध्याच्या हिंदू-मुस्लिम द्वेषाच्या वातावरणात हे गाणं नकळत देशभक्तांचा ओठावर येत आहे. जाती-धर्माचा नावावर माणसे विभागली जात असताना महाराष्ट्रातील चंद्रपूरमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ५ फेब्रुवारी २०१९ रोजी तामिळनाडूची स्नेहा प्रतिभाराज 'नो कास्ट, नो रिलीजन' प्रमाणपत्र मिळविणारी देशातील पहिली महिला ठरली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Chandrapur News
'नो कास्ट ,नो रिलीजन'; जात, धर्ममुक्तीचं महाराष्ट्रारात केवळ एकाच महीलेकडे असणार प्रमाणपत्र


यासाठी त्यांना सुमारे नऊ वर्ष कायदेशीर संघर्ष करावा लागला. आता चंद्रपूरच्या रहिवासी असलेल्या अ‍ॅड. प्रितीशा शाह ह्या देशातील दुसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला ठरणार आहेत. त्यांना जात आणि धर्म नसल्याचं प्रमाणपत्र हवं आहे. यासाठी त्यांनी १९ मे २०२२ रोजी स्थानिक जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांना लेखी अर्ज देऊन जात, धर्म नसल्याचा दाखला देण्याची मागणी केली आहे. चंद्रपूरच्या सरकारनगर येथील रहिवासी अ‍ॅड. प्रितीशा शाह यांच्या मते, त्या एका हिंदू कुटुंबातून आल्या आहेत. ते वैश्य जातीत आणि हिंदू धर्मात वाढले. पण आता देशाची सद्यस्थिती पाहता ते दुखावले आहेत. त्यांनी जात-धर्मापासून मुक्त होण्याचा संकल्प केला आहे.

चेन्नईच्या अखेरच्या सामन्यात धोनीचा मोठा गौप्यस्फोट, आयपीएलबाबत घेतला मोठा निर्णय
संविधानाच्या अनुच्छेद २५ नुसार, लोकांना स्वतःचा धर्म निवडण्याचा आणि आचरण करण्याचा अधिकार आहे. धर्मापासून अलिप्त राहण्याचाही अधिकार आहे. राज्यघटनेच्या कलम १९ - (१) (अ) मधील अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार, जर कोणाला जात-धर्मापासून अलिप्त राहून जीवन जगायचे असेल, तर तशी तरतूद आहे. संविधानातील मूल्ये, तत्त्वे आणि विचारधारेवर त्यांचा विश्वास आहे. आपल्या मूलभूत अधिकारांचा वापर करून त्यांनी 'नो कास्ट, नो रिलीजन' सर्टिफिकेटसाठी कायदेशीर आणि प्रशासकीय लढा सुरू केला आहे.

RR vs CSK Live Score IPL 2022 : चेन्नईचा शेवट पराभवानेच, राजस्थानने साकारला दमदार विजय
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनासोबतच भविष्यात जात आणि धर्माच्या आधारावर सुविधांचा त्याग करायचा आहे, असे प्रितिशा शाह यांनी सांगितलं. भविष्यात त्यांना त्यांच्या कोणत्याही प्रमाणपत्रात जात आणि धर्माचा उल्लेख करायचा नाही. संवैधानिक मूल्यांवर निष्ठा ठेवून भारतीय असल्याची ओळख व्यक्त करताना तिला धर्म, जात याशिवाय आपले जीवन जगायचे आहे. प्रीतिषाचे हे विनंतीपत्र जिल्हा प्रशासनाने पुढील कार्यवाही आणि प्रक्रियेसाठी पाठवले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज