अ‍ॅपशहर

अपक्ष आमदाराचा एकनाथ शिंदेंच्या गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट, वाचा काय म्हणाले...

Maharashtra Politics News : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. अशात आपल्याकडे ४६ आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. पण त्यांना आणखी काही आमदारांचं समर्थन हवं असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jun 2022, 2:13 pm
चंद्रपूर : शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून निरोप आला असल्याची माहिती चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मविआ वेगळ्या संकटात असल्याने त्यांचा निरोप आला नसेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शिवसेनेतून फुटून बाहेर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणखी काही आमदारांचे समर्थन भविष्यात अपेक्षित असल्याचा मोठा गौप्यस्फोट किशोर जोरगेवार यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Eknath Shinde news


अपक्ष आमदार आणि फुटीर शिवसेना यांच्यात वेगळा गट निर्मितीचे सध्या प्रयत्न होत आहेत. शिंदे गटाने मागितलेल्या प्रस्तावावर आ. किशोर जोरगेवार त्यांचे निकटवर्तीय आणि चंद्रपूर मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. राज्यातील अन्य अपक्ष आमदारांशी बोलणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदेंच्या गळाला लागला अपक्ष आमदार, मुंबईला निघालो सांगून थेट गुवाहाटीकडे रवाना
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील तातडीने मुंबईकडे रवाना झाले होते. पण आता ते थेट गुवाहाटीला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गळाला आणखी एक अपक्ष आमदार लागला असून ते इतरांशी संपर्क करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पुढच्या काळात अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज