अ‍ॅपशहर

अरे बाप रे! पोटात दुखू लागल्याने डॉक्टरकडे गेला, मात्र ऑपरेशननंतर सगळेच अवाक्, पोटातून निघाला...

Chandrapur News Today : प्रभाकर राऊत यांना किडनीस्टोनचा त्रास असल्याने अतिवेदना होऊ लागल्या. कुटुंबियांनी त्यांना लगेच ब्रह्मपुरीतील एका खाजगी रुग्णालयात हलवले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Mar 2023, 10:36 am
चंद्रपूर : जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या किडनीमधून अर्धा किलोचा खडा निघाल्याची घटना समोर आली आहे. प्रभाकर राऊत (वय ५५) यांच्या किडनीमधून डॉक्टरांनी ३ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर हा खडा काढला. प्रभाकर राऊत हे ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी येथील रहिवासी आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chandrapur patient
चंद्रपूर रुग्ण


याबाबतची अधिक माहिती अशी की, प्रभाकर राऊत यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याने अतिवेदना होऊ लागल्या. कुटुंबियांनी त्यांना लगेच ब्रह्मपुरीतील एका खाजगी रुग्णालयात हलवले. प्राथमिक तपासनंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी सहमती दर्शवताच डॉ. सुमित जयस्वाल यांनी तीन तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तब्बल अर्धा किलो वजनाचा खडा बाहेर काढला.

कलर प्रिंटरमधून छापल्या कोऱ्या करकरती नोटा; १९ वर्षाच्या तरुणाचं डोकं बघा कसं चाललं; घरात शिरताच पोलीस हैराण...

का होतो मुतखडा?

पाणी अथवा पातळ पदार्थ कमी घेण्याने किंवा श्रम, व्यायाम, जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार होण्याचे प्रमाण वाढते. मूत्रमार्गात होण्याऱ्या जंतुसंसर्गामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे मुतखड्यात रूपांतर होते.

दरम्यान, सामान्यतः मुतखडा झाल्याची लक्षणे दिसत नाहीत. परंतु, जेव्हा मूत्रमार्गात त्याची हालचाल होते किंवा अचानक अडथळा निर्माण होतो त्यावेळी तीव्र वेदना होतात. ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत किंवा पोटात वेदना होतात.

महत्वाचे लेख