अ‍ॅपशहर

६९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

धुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायतीसाठी बुधवारी (दि. १३) मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यासाठी शहरातील २७ मतदान केंद्रांवर मतदान झाले. यात नगराध्यक्षपदासाठी राजकीय पक्षांसह अपक्ष असे एकूण ६९ उमेदवार रिंगणात आहेत.

Maharashtra Times 14 Dec 2017, 4:00 am
शिंदखेडा नगरपंचायतीसाठी ७२ टक्के मतदान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 72 percent voting for shindkheda nagarpanchyat election
६९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद


धुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायतीसाठी बुधवारी (दि. १३) मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यासाठी शहरातील २७ मतदान केंद्रांवर मतदान झाले. यात नगराध्यक्षपदासाठी राजकीय पक्षांसह अपक्ष असे एकूण ६९ उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरपंचायतीच्या १७ प्रभागांत बुधवारी, सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मतदान प्रक्रियेला शांततेत सुरुवात झाली. दुपारी बारा वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले होते. तर मतदानाच्या शेवटच्या घटकांपर्यंत अर्थात सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत जवळपास ७२ टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या निवडणुकीत मॉडेल मतदान केंद्र म्हणून १७ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक १० हे मॉडेल मतदान केंद्र म्हणून प्रशासनाने विकसित केले. या मतदान केंद्रातील वातावरण आल्हाददायक व प्रसन्न ठेवण्यासाठी प्रथम येणाऱ्या दहा मतदारांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मतदारांना रोप भेट देण्यात आले, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी अजित निकम यांनी दिली. शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे, माजीमंत्री हेमंत देशमुख, काँग्रेसचे शामकांत सनेर आणि समाजवादीचे विजयसिंग राजपूत या दिग्गजांनी आपली राजकीय शक्ती वापरली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज