म. टा. वृत्तसेवा, धुळे
कॉंग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी हे येत्या १ मार्च रोजी धुळ्यात येत आहेत. त्यांच्या जाहीर सभेसाठी प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (दि. २१) शहरातील तीन मैदानांची पाहणी केली.
या वेळी त्यांच्यासमवेत स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. पाहणीनंतर माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या निवासस्थानी खासदार चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. त्यानंतर मालेगावरोडवरील आमदार अमरीश पटेल यांच्या संपर्क कार्यालयात स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. यानंतर खासदार अशोक चव्हाण यांनी देवपुरातील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानाची पाहणी केली. खासदार राहुल गांधी यांचे विमान अथवा हेलिकॉप्टरने आगमन झाल्यास देवरे अभियांत्रिकीच्या मैदानावरील हेलिपॅडचा उपयोग होऊ शकतो. त्या अनुषंगानेदेखील चाचपणी करण्यात आली.
याशिवाय अशोक चव्हाण यांनी पारोळारोडवरील डोंगरे महाराज नगरातील मोकळ्या जागेसह मालेगावरोडवरील गोशाळेच्या मैदानाचीही पाहणी केली. त्यांच्यासमवेत आमदार कुणाल पाटील, डॉ. हेमंत देशमुख, डॉ. शोभा बच्छाव, आमदार काशिराम पावरा, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, जिल्हाध्यक्ष शाम सनेर, नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे उपस्थित होते.