धुळे : गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील फाशीपूल चौकाजवळ गटारीचे काम रखडलेले आहे. या कामाची स्थिती कधी सुरू तर कधी बंद अशी आहे. यामुळे सहा महिन्यांपासून वाहतुकीची कोंडी होवून नागरिकांना मोठा संघर्ष वाहन चालवितांना करावा लागत आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी धुळे बार असोसिएशनच्या वकिलांनी बुधवारी फाशी पूल चौकात गटारीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी आंदोलन केले. मनपा विभागाकडे नागरिकांनी मनपाकडे तक्रार करूनही गटारीचे काम पूर्ण करण्यात येत नाही, अशी तक्रारही यावेळी करण्यात आली. यावेळी अॅड. शामकांत पाटील, अॅड. समीर सोनवणे, अॅड. मधुकर भिसे, अॅड. अमित दुसाणे यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धुळे बार असोसिएशनच्या वकिलांकडून निषेध
गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील फाशीपूल चौकाजवळ गटारीचे काम रखडलेले आहे. या कामाची स्थिती कधी सुरू तर कधी बंद अशी आहे. यामुळे सहा महिन्यांपासून वाहतुकीची कोंडी होवून नागरिकांना मोठा संघर्ष वाहन चालवितांना करावा लागत आहे.
Maharashtra Times 24 Mar 2017, 4:00 am