अ‍ॅपशहर

धुळे महापालिकेचा २७५ कोटींचा अर्थसंकल्प

महानगरपालिकेचा नागरिकांवर कुठलाही करवाढ अथवा आर्थिक बोजा न टाकणारा २७५ कोटींचा अर्थसंकल्प गुरुवारी महासभेसमोर सादर करण्यात आला. महापौर कल्पना महाले यांनी अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदीचे वाचन महासभेत करीत त्यास मंजुरी देण्याचे आवाहन नगरसेवकांना केले. दरम्यान, महासभा ऐन पावसाळ्यात उद्भवलेल्या पाणीटंचाई आणि दूषित पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यांवर गाजली.

Maharashtra Times 20 Jul 2018, 4:00 am
करवाढ नसलेला अंदाजपत्रक महासभेसमोर सादर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dhule municipal corporation annual budget of 275 crores present in mahasabha
धुळे महापालिकेचा २७५ कोटींचा अर्थसंकल्प


म. टा. वृत्तसेवा, धुळे

महानगरपालिकेचा नागरिकांवर कुठलाही करवाढ अथवा आर्थिक बोजा न टाकणारा २७५ कोटींचा अर्थसंकल्प गुरुवारी महासभेसमोर सादर करण्यात आला. महापौर कल्पना महाले यांनी अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदीचे वाचन महासभेत करीत त्यास मंजुरी देण्याचे आवाहन नगरसेवकांना केले. दरम्यान, महासभा ऐन पावसाळ्यात उद्भवलेल्या पाणीटंचाई आणि दूषित पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यांवर गाजली.

महापालिकेच्या अंदाजपत्रक मंजुरीसाठी गुरुवारी विशेष महासभा घेण्यात आली. मनपाचे सन २०१७-१८ चे सुधारित व सन २०१८-१९ चे मूळ अंदाजपत्रक अंतिम मान्यतेसाठी महासभेपुढे ठेवण्यात आले. प्रशासनातर्फे २०१८-१९ साठी २५४ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. स्थायी समितीपुढे आल्यानंतर त्यात नव्याने तरतुदी सूचवित एकूण २७५ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या सभापती वालीबेन मंडोरे यांनी महापौर कल्पना महाले यांच्याकडे सादर केले. ते सभागृहात सादर करण्यात आले.

नागरिकांवर करवाढचा कोणताही आर्थिक बोजा न टाकता अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, स्थायी समितीने मुलभूत नागरी सेवा सुविधांच्या कामांसाठी नगरसेवक निधी म्हणून प्रत्येकी २० लाख रुपये अशी १५ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे या वेळी महापौर महाले यांनी सांगितले. ती मान्य करण्यात आली. या अंदाजपत्रकात उत्पन्नवाढीचा विचार करण्यात आला आहे.

शहर हद्दवाढीसह गुणवंतांना शिष्यवृत्ती
शहराचा विस्तार वाढत असून, नुकतीच शहरालगतची ११ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली आहेत. मात्र, त्या प्रमाणात मनपाच्या महसूल उत्पन्नात वाढ झालेली नाही. ते वाढविण्यासाठी प्रभावी व कार्यक्षमपणे प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच हद्दवाढ झालेल्या ११ गावांचा जमीन वापर नकाशा तयार करण्यासाठी २ कोटी रुपये तरतूद करण्यात आली असल्याचे महासभेत जाहीर करण्यात आले. तसेच शहरातील १० वी व बारावीच्या परीक्षांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना १ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज