अ‍ॅपशहर

धुळे महानगरपालिकेचे प्रदीप कर्पे यांचा महापौर पदाचा राजीनामा

धुळे महानगरपालिका आयुक्त व नगर सचिवांकडे प्रदीप कर्पे यांनी राजीनामा सुपूर्द केला असून आपण सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखत राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2022, 11:40 am
धुळे : धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप कर्पे यांनी काल संध्याकाळी उशिरा आपल्या महापौर पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखत उर्वरित कालावधीत आपण राजीनामा देत असल्याचे प्रदीप कर्पे यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. धुळे महानगरपालिका आयुक्त व नगर सचिवांकडे हा राजीनामा त्यांनी सुपूर्द केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम धुळे महानगरपालिका महापौर


ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल असून आज या याचिकेवर अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. धुळ्यातील महापौर पदाच्या निवडणुकीत ट्रिपल टेस्टचे पालन केले नाही म्हणून न्यायालयात याचिका दाखल आहे. यावरून न्यायालयाचा आदर करत महापौर प्रदीप कर्पे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख