रावेर तालुक्यात आठ नवीन रुग्ण
म. टा. वृत्तसेवा, रावेर
शहरासह तालुक्यात शनिवारी प्राप्त अहवालांमध्ये आठ नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत.
यामध्ये रावेर शहरातील भगवतीनगरात एक पुरुष तर जुना सावदा रोडवरील जिजाऊनगर येथे एक महिला व एक पुरुष पॉझिटिव्ह आढळले. याचबरोबर तालुक्यातील खानापूर येथे एक महिला तर सावदा येथे तीन पुरुष व एक महिला असे आठ जणांचा समावेश आहे. प्रशासनाकडून खबरदारी म्हणून उपाययोजना सुरू असून, नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.