अ‍ॅपशहर

हतनूरसह प्रकाशा बॅरेजचे दरवाजे खुले

नंदुरबार जिल्ह्यातील तापीकाठच्या गावाजवळील बॅरेजमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पूरसदृश्य परिस्थिती उद्भवू नये यासाठी खबरदारी म्हणून हतनूर धरणासह प्रकाशा बॅरेजचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे.

Maharashtra Times 12 Jul 2018, 11:33 pm
पूरसदृश्य परिस्थिती उद्भवू नये यासाठी खबरदारी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hatnur dam and prakasha barrage gates open for water flow in nandurbar district
हतनूरसह प्रकाशा बॅरेजचे दरवाजे खुले


म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील तापीकाठच्या गावाजवळील बॅरेजमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पूरसदृश्य परिस्थिती उद्भवू नये यासाठी खबरदारी म्हणून हतनूर धरणासह प्रकाशा बॅरेजचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे.

प्रकाशा बॅरेजचे सर्व दरवाजे गुरुवारी (दि. १२) उघडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह प्रवाहित झाला आहे. यामुळे तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात मध्यप्रदेश व शहादा तालुक्यातील बामखेडासह परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. यामुळे नदी-नाले दुथडी वाहून पूर आला. परिणामी तापी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. यामुळे हतनूर धरणाचे बुधवारी (दि. ११) सकाळी १८, दुपारी २४ व काही वेळाने पुन्हा ३६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. यातून एकूण १३३२ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग धरणातून होत आहे. यामुळे प्रकाशा बॅरेजचा एक दरवाजा बुधवारी (दि. ११) दुपारी उघडण्यात आला. याची दखल घेत तापी नदीकाठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये दिली आहे. तसेच तापी नदी काठावरील गावांना कार्यरत तलाठी, मंडळाधिकारी यांनी मुख्यालय सोडू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज