धुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे बालिका अत्याचारप्रकरणी नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी सर्व समावेशक महामूक मोर्चा आज (दि. ८) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. याबाबतची माहिती माजी महापौर भगवान करणकाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मूकमोर्चाला शहरातील ३८ समाजांनी, ५० सामाजिक संघटना तसेच भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी यांसह अन्य राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे, असेही करणकाळ यांनी माहिती देताना सांगितले.
धुळ्यात आज महामूकमोर्चा
जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे बालिका अत्याचारप्रकरणी नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी सर्व समावेशक महामूक मोर्चा आज (दि. ८) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
Maharashtra Times 8 Mar 2018, 4:00 am