अ‍ॅपशहर

‘मनमाड-इंदूर’वरून जुंपली

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात येत्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होत आहे. सगळ्यात आधी धुळे-नरडाणा या सेक्शनमध्ये काम सुरू केले जाणार आहे. त्यात पांझरा नदीवर एक मोठ्या पुलासह इतर ४ पूल नरडाण्यापर्यंत बांधले जातील. त्याचे टेंडर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निघेल, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी धुळ्यात दिली. यावेळी खासदार डॉ. भामरे यांनी आमदार अनिल गोटे यांचे नाव न घेता टीका केल्याने पुन्हा एकदा दोघं नेत्यामध्ये ‘मनमाड-इंदूर’रेल्वेमार्गावरून जुंपली आहे.

Maharashtra Times 16 Jul 2018, 4:00 am
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भामरे आणि आमदार गोटेंत पुन्हा वाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manmad indore railway works start issue between dhule mla and mp
‘मनमाड-इंदूर’वरून जुंपली

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात येत्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होत आहे. सगळ्यात आधी धुळे-नरडाणा या सेक्शनमध्ये काम सुरू केले जाणार आहे. त्यात पांझरा नदीवर एक मोठ्या पुलासह इतर ४ पूल नरडाण्यापर्यंत बांधले जातील. त्याचे टेंडर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निघेल, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी धुळ्यात दिली. यावेळी खासदार डॉ. भामरे यांनी आमदार अनिल गोटे यांचे नाव न घेता टीका केल्याने पुन्हा एकदा दोघं नेत्यामध्ये ‘मनमाड-इंदूर’रेल्वेमार्गावरून जुंपली आहे.

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामाबाबत नुकतीच धुळ्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये डॉ. भामरे यांनी ही माहिती दिली. तसेच या टेंडच्या प्रक्रियेपंतर भूमिपूजन कार्यक्रमाची तारीख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जाहीर करणार आहेत. त्यामुळे आजपर्यंत फक्त धुळ्यात आदळआपट करीत खोट्या तारखा सांगून लोकांची दिशाभूल करणारे, खोटेनाटे आरोप करून जनतेत भ्रम निर्माण करणारे मि. खोटे पुन्हा एकदा जनतेसमोर उघडे पडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केली.

या पत्रकार परिषदेत राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, मी मागच्या आठवड्यात ४ जुलैला नितीन गडकरी, रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत बैठक घेतली असून, त्यात मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामध्ये महत्वाचे करार पूर्ण करून एमओयूवर स्वाक्षरी करण्यासाठी टाईमबॉण्ड वेळापत्रक निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या ऑगस्ट महिन्यात मनमाड-धुळे-इंदूर या जनेतेच्या स्वप्नातील रेल्वे मार्गाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होणार हे आता काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे, असे डॉ. भामरे यांनी शेवटी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज