अ‍ॅपशहर

मंत्री महाजनांच्या प्रतिमेला शेण फासले

दारूला महिलांचे नाव दिले तर अधिक खप होईल, असे जाहीर सभेत व्यक्तव्य करून महिलांचा अवमान करणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

Maharashtra Times 7 Nov 2017, 4:00 am
राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून निषेध
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nationalist congress party womens wing prohibition of minister girish mahajan at dhule
मंत्री महाजनांच्या प्रतिमेला शेण फासले


म. टा. वृत्तसेवा, धुळे

दारूला महिलांचे नाव दिले तर अधिक खप होईल, असे जाहीर सभेत व्यक्तव्य करून महिलांचा अवमान करणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सोमवारी (दि. ६) शहरातील महाराणा प्रताप चौकात मंत्री महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शेण लावून चपलांचा मारा महिलांनी दिला.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात मंत्री महाजन भाषण करताना, साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या दारूच्या ब्रॅन्डला महिलांचे नाव दिल्यास त्याचा जास्त खप होईल, असा उघड सल्ला दिला होता. त्यामुळे महिलांविषयी असे बेताल वक्तव्य करून मंत्री महाजन यांनी महिला वर्गाचा अवमान केला आहे. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक फोटोला शेण लावून चपला मारण्यात आल्या. या वेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, प्रियंका पाटील, सुमित्रा चौधरी, राधिका ठाकूर, भारती पवार, वंदना पाटील, सुवर्णा बेहरे, मालती पाडवी, इंदूबाई वाघ उपस्थित होत्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज