अ‍ॅपशहर

मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, फडणवीसांवर बोचरी टीका; अनिल गोटेंविरोधात गुन्हा दाखल

धुळ्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोटे यांनी टीका केली होती.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jul 2022, 2:15 pm
धुळे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपल्या पत्रकातून टीका करणाऱ्या माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्या विरोधात धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित चांदोडे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अनिल गोटे आणि भाजपामधील वाद अजून चिघळण्याची चिन्ह आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम police case registered against ncp leader anil gote in dhule
उपमुख्यमंत्री फडणवीसांवर बोचरी टीका, अनिल गोटेंवर धुळ्यात गुन्हा दाखल


राज्यात सत्ता संघर्षाच्या काळात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पत्रकातून कडाडून टीका केली होती. तसेच या पत्रकात अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विविध संबोधने लावली होती. माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या टीकेच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचे धुळे जिल्हाध्यक्ष रोहित चांदोडे यांच्या तक्रारीवरून आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता गोटे आणि भाजपमधील हा वाद पोलिसात गेला आहे.

'देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्वप्नातही विश्वास ठेवू नका'; अनिल गोटेंचे मुख्यमंत्री शिंदे यांना

अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे थांबवावे अन्यथा भाजप युवा मोर्चा तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. अनिल गोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर धुळे जिल्ह्यात गोटे समर्थक आणि भाजप असा वाद चिघळण्याची चिन्ह आहेत. अनिल गोटे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर आता अनिल गोटे समर्थक काय भूमिका घेतात आता याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आमदाराच्या कार्यालयात उद्धव ठाकरेंना डावलून बाळासाहेबांसोबत शिंदे फडणवीसांचे फोटो

महत्वाचे लेख