धुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा पोलिस ठाण्यात असलेल्या गुन्ह्यातील दोषारोपपत्र कोर्टात दाखल केलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी लागलेले पैसे तक्रारदाराकडून पोलिस निरीक्षकाने मागितले. या कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी पंधराशे रुपये खर्च न देता तक्रारदाराने एसीबीला तक्रार केली. त्यावर कारवाई करीत धुळे एसीबीने बुधवारी (दि. २६) दुपारी पोलिस निरीक्षक देविदास भोज यांच्यावर रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली.
लाचखोर निरीक्षकास रंगेहाथ अटक
जिल्ह्यातील शिंदखेडा पोलिस ठाण्यात असलेल्या गुन्ह्यातील दोषारोपपत्र कोर्टात दाखल केलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी लागलेले पैसे तक्रारदाराकडून पोलिस निरीक्षकाने मागितले.
Maharashtra Times 27 Jul 2017, 4:00 am