अ‍ॅपशहर

रेशनच्या दुकानांमध्ये पीओएस मशिन

देशभरात सर्वत्र रोखीने होणाऱ्या व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे रेशनच्या सर्व दुकानांमध्ये 'पॉइंट ऑफ सेल' मशिनची (पीओएस) सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Maharashtra Times 30 May 2017, 4:00 am
धुळे जिल्ह्यात ९८५ दुकानांमध्ये आठवड्याभरात उपलब्धता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pos machines to ration shop in dhule
रेशनच्या दुकानांमध्ये पीओएस मशिन


म. टा. वृत्तसेवा, धुळे

देशभरात सर्वत्र रोखीने होणाऱ्या व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे रेशनच्या सर्व दुकानांमध्ये 'पॉइंट ऑफ सेल' मशिनची (पीओएस) सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातदेखील तीन टप्प्यात ही प्रक्रिया सुरू असून, धुळे जिल्ह्यासाठी येत्या आठवड्यात 'पीओएस' मशिन उपलब्ध होणार आहे. हे उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील ९८५ रेशन दुकानांमध्ये बसविण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी सर्व शिधापत्रिका धारकांचे आधारक्रमांक शिधापत्रिकेशी जोडण्यात आले आहेत. तसेच कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व रेशन दुकानांमध्ये पीओएस मशिन बसविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश असून, येत्या आठवड्यात पीओएस मशिन उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यात एकूण ९८५ रेशन दुकाने व सुमारे १४ लाख लाभार्थी आहेत. जिल्ह्यात प्रायोगिक स्वरुपात साक्री व शिरपूर तालुक्यात प्रत्येकी एका रेशन दुकानात सदर 'पीओएस' मशिन यापूर्वीच बसविण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज