अ‍ॅपशहर

बिथरलेला बैल कारमध्ये शिरतो तेव्हा..., पाच जण बालंबाल बचावले, शहाद्यातील घटना

Dhule News: शहादा तालुक्यात टूकी येथे अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. कारमध्ये पाच जण असतांना अचानक बिथरलेला बैल कारमध्ये शिरला.

Edited byकिशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स 18 Mar 2024, 11:50 am
म. टा. वृत्तसेवा, धुळे : लग्न समारंभातून परतताना शहादा तालुक्यातील टूकी येथील बस स्थानकाजवळ तीन बैलांची सुरू असलेल्या झुंजीदरम्यान यातील एक बैल बिथरला आणि तो झुंजीमुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या कारची (जीजे १९ एम ५१५४) काच फोडून थेट वाहनात शिरला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bull in car
बिथरलेला बैल कारमध्ये शिरतो तेव्हा...


काय घडलं?

तीन बैलांची सुरू असलेल्या झुंजीदरम्यान यातील एक बैल बिथरला आणि तो झुंजीमुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या कारची (जीजे १९ एम ५१५४) काच फोडून थेट वाहनात शिरला. मात्र, सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नसल्याने कारमधील पाचही जण सुखरूप आहेत. या घटनेने ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीची प्रचिती आल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
बारामती आगारातील बस खिळखिळ्या; ब्रेकसाठी लावली वीट, तर काचेला बाटलीचा आधार
शहादा तालुक्यातील दामळदा येथील उपसरपंच डॉ. विजय नामदेव चौधरी, विद्याबाई विजय चौधरी, लताबाई भरत पाटील, रिताबाई प्रकाश पाटील, कृष्णा ठाणसिंग गिरासे हे सर्व शहादा येथील एका लग्न समारंभ आटोपून येताना त्यांनी चारचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली होती. त्या वेळी हा प्रकार घडला.
लेखकाबद्दल
किशोरी तेलकर
किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख