अ‍ॅपशहर

दुहेरी हत्याकांडाने धुळे हादरले, तरवाडे येथील धक्कादायक घटना

धुळे पुन्हा हत्याकांडाने हादरले आहे. तरवाडे गावात दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. आई आणि मुलीची हत्या झाल्याचं पहाटे समोर आलं. पोलिसांनी मायलेकींचे मृतदेह शवविच्छेदनासाठासाठी पाठवले असून तपास सुरू केला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 May 2022, 3:21 pm
धुळे : धुळे तालुक्यातील तरवाडे गावात धारदार शस्त्राने वार करून मायलेकींची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. धुळे तालुक्यातील तरवाडे या गावात हॉटेल व्यवसाय करणाऱ्या चंद्रभागाबाई माळी (वय वर्षे ६५) आणि त्यांची मुलगी वंदना महाले (वय वर्षे ४५) यांचा पहाटेच्या दरम्यान धारदार शस्त्राने खून करण्यात आला. दोन्ही मायलेकींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यामध्ये आढळून आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम two women murdered in tarwade dhule
दुहेरी हत्याकांडाने धुळे हादरले, तरवाडे येथील धक्कादायक घटना


धुळे तालुक्यातील तरवाडे या गावामध्ये खुनाच्या घटनेने एकच खळबळ उडाली. यासंदर्भात धुळे तालुका पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी फिंगरप्रिंट एक्सपर्ट त्याचबरोबर इतर तपास यंत्रणांच्या माध्यमातून तपासाला सुरवात केली आहे. खुनाचे कारण अजून समजू शकले नाही. तालुका पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गावातील एका संशयिताला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

'ज्याचे खाल्ले त्यालाच गंडवले'; धुळ्यात दोघांनी ७२ लाखांच्या दागिन्यांवर मारला

वैवाहिक वाद सुरू असल्यामुळे मुलगी वंदना महाले आईकडेच राहत होती. आणि तरवाडे गावातच हॉटेल व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होती. मात्र आज पहाटे मायलेकींचे रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने या संदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत. मायलेकींचे मृतदेह धुळे पोलिसांनी ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पुढील तपास धुळे तालुका पोलिस करत आहेत. या संदर्भात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सध्या सुरू आहे.

तीन वाहनांच्या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, तब्बल ६ जण गंभीर जखमी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज