अ‍ॅपशहर

फिल्मी स्टाईलने जावयाची हत्या, दुचाकीला मृतदेह बांधून नदीत फेकला; १५ दिवसांनी पाहा काय झालं

Gadchiroli Crime : गडचिरोलीमध्ये गुन्ह्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून यामध्ये पोलिसांनी तब्बल १५ दिवसांनी खुनाचा छडा लावला आहे. यामध्ये मेव्हण्यांनीच जावयाची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Aug 2022, 10:46 am
गडचिरोली : जावयासोबत झालेल्या भांडणात दोन सख्या मेव्हण्यांनी बेदाम मारहाण करून जिवे मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या दुचाकी वाहनाला मृतदेह बांधून नदीत ढकलले. एखाद्या चित्रपटात शोभेल, असा हा प्रसंग एटापल्ली तालुक्यातील एकरा टोला या गावात २२ जुलै रोजी घडला. तब्बल पंधरा दिवसांनी या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम murder news today in maharashtra


दिलीप राजू बारसा (२४ वर्षे) असे मृतकाचे नाव असून टोयोटापल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोडसा ग्रामपंचायतमधील आलेंगा येथील रहिवासी होता. तर केशव पांडू मठ्ठामी (३० वर्षे) आणि बालाजी पांडू मठ्ठामी (३५ वर्षे) दोघेही राहणार एकरा टोला अशी हत्या करणाऱ्या आरोपी मेव्हण्यांची नावे आहेत.

Dhule News: बापरे! डोळ्यात चक्क २४ तास शिरला होता चाकू, देवदूतासारखे डॉक्टर आले धावून...
पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना लहान मुलगी आहे. परंतु, सतत कौटुंबिक वाद सुरू असायचे. एक राठोडा व आलंगा या गावांचे अंतर दहा किलोमीटर आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबांचे एकमेकांच्या घरी नेहमी येणे-जाणे सुरू असायचे. २२ जुलैला दोन्ही मेव्हणे आणि त्यांचे जावई यांच्यात भांडण झाले. त्यामुळे दोघांनी मिळून जावयाची बेदम पिटाई केली. या मारहाणीत जावई दिलीप बारसा गंभीर जखमी झाले. पण त्यांना दवाखान्यात न आणता दोन्ही भावांनी त्यांना जीवे मारून टाकले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी एकरा टोला गावाजवळील बांधे नदीच्या पात्रात दुचाकीला मृतदेह बांधून नदीत ढकलले.

आठवडाभर केली शोधाशोध

ही घटना घडली त्यावेळी जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे मृतदेह दुचाकीसह नदीत वाहून गेला असा देखावा करता येईल, अशी दोन्ही मेव्हण्यांची योजना होती. इकडे २२ जुलैपासून दिलीप दिसत नसल्यामुळे घरच्यांनी आठ दिवस दिलीपची शोधाशोध केली. अखेर कुठेच सापडत नसल्याने दिलीपच्या वडिलांनी ३० जुलैला पोलीस ठाण्यात दिलीप बेपत्ता असल्याची माहिती दिली.

Shocking Video: एक-दोन नव्हे तर तब्बल १४ महागड्या गाड्या पाण्यात तरंगल्या, सत्य समोर येताच सगळे हादरले
आरोपींनी दिली खुणाची कबुली

ठाणेदार विजयानंद पाटील यांनी कौटुंबिक माहिती घेतली. दोन्ही कुटुंबातील सर्व सदस्यांचे वेगवेगळे बयान घेतले. गावकऱ्यांकडूनही माहिती घेतली. यात पाटील यांना दिलीपचे दोन्ही मेव्हणे केशव व बालाजी यांच्यावर शंका आली. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच दोघांनीही अखेर हत्येची कबुली दिली. त्यांच्यावर आता हत्येचा गुन्हा दाखल केला असून, दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.

नदीतून काढला हाडांचा सापडा

आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, बांदे नदीच्या पात्रात मृतदेह आणि दुचाकीचा शोध घेण्यात आला. मृतदेह गाडीला बांधून ठेवल्याने तो जास्त दूर वाहत जाणार नाही, याची कल्पना होती. त्यानुसार नदीतून दुचाकी आणि मृतदेहाचा शिल्लक राहिलेला हाडांचा सापळा पोलिसांच्या हाती लागला.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज