अ‍ॅपशहर

सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार बॅटींग; विदर्भातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग बंद, वाचा अपडेट...

Maharashtra News : विदर्भात पाऊस रविवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे वाशिममध्ये नदी नाल्यांना पूर आला आहे. शेकडो एकर पिकं पाण्याखाली गेली आहेत. वर्धा जिल्ह्यातील पावसामुळे काही रस्ते बंद आहेत. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणामधून विसर्ग करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही पावसाने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Aug 2022, 12:55 pm
गडचिरोली : जिल्ह्यात रविवारपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जोर धरला आहे. आज सकाळपासून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गासह काही महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gadchiroli news today
गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती!, अनेक महत्त्वाचे मार्ग झाले बंद; शेतकरी चिंतेत


गेल्या महिन्यात जवळपास ८ जुलै ते २२ जुलैपर्यंत गडचिरोली जिल्हावासीयांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागला. हळूहळू ही परिस्थिती सावरत असताना पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवडाभरात गडचिरोली जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतशिवारांमध्ये अंतर्गत मशागतीची कामे वेगात सुरू होती. ही कामे सुरू असताना पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाणार का? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात रविवारपासून पावसाने हजेरी लावली. सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने आज जिल्ह्यातील काही महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहेत. त्यात चांदाबळा-कुंभी, रानमुल-माळेमूल, पोटेगाव-देवापूर, साखरा-कारवाफा, मुलचेरा-आष्टी, आलापल्ली-भामरागड या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. अजूनही मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाला आहे. त्यामुळे बरेच मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहेत हे विशेष.

अजित पवारांनी बांधावर जात शेतकऱ्यांचे अश्रू पुसले; सरकारला सवाल, '... जगायचे

मागील जुलै महिन्यात गडचिरोली जिल्ह्याला पूर परिस्थितीचा सामना करावा लागला होता. अहेरी उपविभागातील पाच तालुक्यांना खूप मोठा फटका बसला होता. गडचिरोलीतील ही दयनीय अवस्था बघता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी भेट देऊन जिल्हा मुख्यालयात आढावा घेतला. तर त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार आणि आमदार रोहित पवार असे राज्यातील दिग्गज नेत्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आस्थेने विचारपूस केली. पूरपरिस्थितीची पाहणी करून योग्य मोबदला देण्याची मागणी केली आणि पूर परिस्थितीमुळे बेघर झालेल्या नागरिकांना वनविभागाची जमीन अधिग्रहण करून पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. सध्या प्रशासनातर्फे पंचनामे सुरू आहेत. अजूनपर्यंत येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

गडचिरोली पुरात उद्ध्वस्त! शेकडो संसार उघड्यावर, चार हजार घरांसह ६०० कोटींचे नुकसान

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज