अ‍ॅपशहर

बैल आला पण गुराखी निघून गेला, वाघाच्या हल्ल्यात...

Gadchiroli tiger Attacked : गुरे घराकडे आणत असताना एका बैलाच्या शोधात पुन्हा जंगलात गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना गुरुवार २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 21 Jan 2022, 6:12 pm
गडचिरोली : गुरे घराकडे आणत असताना एका बैलाच्या शोधात पुन्हा जंगलात गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना गुरुवार २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. परंतु रात्री उशिरा ही घटना समोर आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra Gadchiroli shepherd killed tiger Attacked


आरमोरी तालुक्यातील कुरंझा गावापासून अडीच किमी अंतरावरील जंगलात हा ह्रदयद्रावक प्रसंग घडला. जालमशहा गोविंदशहा सयाम (६५) रा. कुरंझा असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जालमशहा हे नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेले होते. सोबत त्यांचा मुलगा भारत हा सुद्धा होता.

गुरे चारल्यानंतर घराकडे परत येत असताना कळपात एक बैल दिसून आला नाही. त्या बैलाचा शोध घेण्यासाठी जालमशहा पुन्हा जंगलात गेले. याच वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला, या हल्ल्यात ते ठार झाले. बैल आला पण गुराखी मात्र कायमचाच निघून गेला.

गडचिरोली जिल्ह्यात वाघाचे हल्ले वाढले असून यापूर्वी सुद्धा वाघाच्या हल्ल्यात अनेकांचे जीव गेले. वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणीसाठी मुख्य वन संवरक्षक कार्यालयासमोर परिसरातील नागरिकांनी आंदोलन सुद्धा केले होते. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. वाघाचे हल्ले सुरुच आहे. कालच्या या घटनेने परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज