अ‍ॅपशहर

गडचिरोलीला मुसळधार पावसाचा तडाखा, अनेक भागांचा संपर्क तुटला

मुंबई कोकणात पावसाने धुमशान सुरू असताना आता विदर्भातही जोरदार पाऊस सुरू आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jul 2022, 12:10 pm
गडचिरोली: मान्सूनने महाराष्ट्राचा संपूर्ण भाग व्यापला असून आता पूर्व विदर्भातही जोरदार पाऊस सुरू आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याता मुसळधार पावसाने झोडपलं आहे. जिल्ह्यातील अहेरी उप विभागातील अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड आणि मुलचेरा या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rain lashes in gadchiroli district
गडचिरोलीला मुसळधार पावसाचा तडाखा, अनेक भागांचा संपर्क तुटला


पावसामुळे राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते बंद आहेत. यामुळे भामरागड आणि सिरोंचा तालुक्याचा तुटला संपर्क आहे. मुलचेरा तालुक्यातील बारसवाडा गावाचा संपर्क तुटला आहे. मुलचेरातील बारसवाडा येथील जि. प. शाळा पाण्याखाली गेली आहे.

पावसामुळे अहेरी राज नगरीत पाणीच पाणी आहे. हत्तीकॅम्पसाठी प्रसिद्ध असलेल्या कमलापूर गावाचाही पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात अनेक भागांमध्ये मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस सुरू आहे. अहेरी उप विभागाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

वाघ आणि बिबटयाच्या झुंजीत बिबट्या ठार; गडचिरोली जवळील घटना

हवामान विभागाचा इशारा

पुढील तीन तास गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी वज्राघात, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

गडचिरोलीचा पहिला-वहिला पायलट; हितेश सोनटक्केची 'फ्लाईंग ऑफिसर' म्हणून निवड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज