अ‍ॅपशहर

आरारा खतरनाक! नद्यांमधून वाहत होते १८ लाकडाचे लठ्ठे, तपास करताच अधिकारी चक्रावले

Gadchiroli Marathi Batmya : तेलंगाणा राज्याच्या सीमेवर दोन्ही रस्त्यावर तपासणी नाका उभारले. तरीही या भागात तस्करी कमी होताना दिसत नाही. तपासणी नाक्यावर पहारा देत असताना तस्करांच्या हल्ल्यात एका वनमजुराचा जीव गेल्याचीही घटना याठिकाणी घडली होती. त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याठिकाणी डोळ्यात तेल टाकून सेवा द्यावी लागते.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jul 2022, 1:57 pm
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग हे मौल्यवान सागवानसाठी प्रसिद्ध आहे. तीन राज्यांची सीमा असल्याने या वनविभागातील मौल्यवान सागवान जंगलावर परराज्याची विशेषतः तेलंगाणाची वक्रदृष्टी पडली आहे. त्यामुळेच येथे सागवान तस्करी सुरूच आहे. सध्या सिरोंचा तालुक्यात पूरपरिस्थिती आहे. तालुक्यातील विविध नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीतही नदी नाल्यातून सागवान तस्करी केली जात आहे. मात्र, यावेळी वनविभागाने धाडसी कारवाई करत १८ सागवान लठ्ठे पकडले. तस्करांचा यावेळी डाव फसला असला तरी 'पुष्पा' अजूनही झुकला नाही, असंच म्हणावं लागेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gadchiroli news today


वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी देचली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पेरकाभट्टी नियत क्षेत्रात वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना मौजा खम्मासूर जवळील नालापात्रातून तब्बल १८ सागवान लठ्ठे पकडण्यात आले. यात एकही आरोपी मिळाले नसले तरी लाखो रुपयांचा सागवान पकडण्यात वन विभागाला यश आले. सध्या नदी-नाल्यांना पूर आल्याने जंगलातील मौल्यवान सागवान लठ्ठे वाहून जाताना सर्वांनाच दिसत आहे. मात्र, हे सागवान लठ्ठे वन विभागाने कापून बिटात साठवलेले आहे की तस्करीसाठी अवैधरित्या कापलेले आहे ? हे तर चौकशीअंतीच समोर येईल. सध्या याचा तपास वनविभाग करीत आहे.

Nagpur Crime: बापजन्म! खुनाचा आरोपी पॅरोलनंतर १२ वर्ष फरार राहिला, मुलींचं शिक्षण पूर्ण होताच केलं आत्मसमर्पण
सिरोंचा वन विभागात सिरोंचा परिसरातील नदी, नाले तुडुंब भरून वाहतानासुद्धा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त घालून केलेली ही कारवाई धाडसीच म्हणावे लागेल. या भागात सुरू असलेली सागवान तस्करी आणि सक्रिय असलेली आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केव्हा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यापूर्वी सुद्धा अनेक कारवाया झाल्या. मात्र, 'पुष्पा'ला झुकविण्यात वन विभागाला अजूनही यश आले नाही.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज