गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील पंचशील चौकामध्ये राहणाऱ्या भाडेकरु महिलेचा गळा चिरुन खून करण्यात आला. ही घटना काल बुधवारी उघडकीस आली होती. शिशुकला साखरे (35) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मृत महिलेच्या अंगावरील दागिने गायब असून घरातील सामानसुद्धा अस्ताव्यस्त पसरलेले होते. त्यामुळे लूटमार करण्याच्या उद्देशाने महिलेची खून करण्यात आली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे देवरी शहरात खळबळ उडाली असून पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. देवरीमध्ये पोलिसांचे श्वान पथक दाखल झाले असून श्वान पथकाने रात्रभर अख्ख देवरी शहर पिंजून काढलं आहे.
मृत शिशुकला साखरे या टेलरिंगचे काम करायच्या. त्यांचे पती छत्रपती शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज देवरी येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. पती ड्युटीवर गेले होते, तर दोन्ही मुले शाळेत गेली होती. सायंकाळी दोन्ही मुले घरी आली तेव्हा बाहेरुन दरवाजा लावलेला होता.
हेही वाचा : रायगडच्या किनाऱ्यावर सापडलेली बोट, शस्त्रास्त्रं कोणाची? समोर आली महत्त्वाची माहिती
कडी उघडून मुलं घरात शिरलेली, तेव्हा त्यांची आई रक्तबंबाळ अवस्थेत फरशीवर पडलेली दिसली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक आणि शेजारी धावून आले.
हेही वाचा : विद्यार्थ्यांच्या शाळेची बस खड्ड्यात कलंडल्याची धक्कादायक घटना
या घटनेची माहिती देवरी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक बनकर व पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला. गोंदियावरून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
घटनास्थळावरील परिस्थिती आणि खून झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिने गायब होते. घरातील कपाट आणि इतर सामानसुद्धा विस्कटलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे ही हत्या लूटमार करण्याच्या प्रकारातून तर झाली नसावी ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. देवरी पोलिस फरार आरोपी शोध घेत आहेत.
हेही वाचा : महिला पोलिसाच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट