अ‍ॅपशहर

राज्य महिला आयोगाच्या महिला सदस्या अधिकार्‍यांवर संतापल्या, चुकीच्या कार्यप्रणालीवर सुनावलं

राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी आढावा बैठक गोंदियात घेतली. यावेळी त्यांनी अधिकार्‍यांना खडे बोल सुनावत म्हणाल्या कार्यवाहीला तयार रहा.

Edited byप्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2022, 1:47 pm
गोंदिया : राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी गोंदिया येथे आढावा बैठक घेत अधिकऱ्यांना त्यांच्या चुकीच्या कार्यप्रणाली वर बोट ठेवत खडे बोल सुनावले आणि पुढील कार्यवाहीसाठी तयार रहा, अशी चेतावणी सुद्धा दिली. आढावा बैठकीत जिल्ह्यातील आयसीआयसी कमेटी ची सत्यता उघड झाली. गोंदिया जिल्यात खाजगी आणि शाशकीय अशी ४ हजार ३०० आस्थापना ठिकाणे आहेत. मात्र, त्यापैकी फक्त १४ ठिकाणी आयसीआयसी कमिटी नेमण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Gondiya News
राज्य महिला आयोगाच्या महिला सदस्या अधिकार्‍यांवर संतापल्या, चुकीच्या कार्यप्रणालीवर सुनावलं


या पार्श्वभूमीवर आभा पांडे यांनी अधिकऱ्यांना या संदर्भात जाब विचारत दमदाटी केली व बाकी आस्थापना ठिकाणी आयसीआयसी का नाही? असा सवाल देखील केला. मात्र, या प्रश्नाचे उत्तर अधिकारी समाधानकारक देऊ शकले नाही. त्यामुळे आभा पांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांला खडे बोल सुनावले लवकरात लवकर उचित माहिती पुरवावी अन्यथा कार्यवाहीसाठी तयार रहा अशी चेतावनी देखील आभा पांडे यांची अधिकाऱ्यांना दिली.

जातीय तेढ निर्माण केल्यास कडक कारवाई, कायदा हातात घेऊ नका; पोलीस महासंचालकांचा इशारा
आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. मात्र, पत्रकार परिषदेचे नियोजन करणाऱ्या महिला बाल विकास विभागाने तयारी न केल्याने आभा पांडे यांनी त्यांना देखील खडे बोल सुनावले यापुढे अशी गैरसोय व्हायला नको, अशी सूचना दिली.
लेखकाबद्दल
प्रशांत पाटील
प्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन'मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज