अ‍ॅपशहर

करोना आणि ओमिक्रॉन वाढू लागल्याने 'या' वनस्पतीची मागणी वाढली, वाचा काय आहे फायदे?

गुळवेलाचे जसे आयुर्वैदिक फायदे आहेत. वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे गूळवेलाचे काही दुष्परिणाम देखील आहेत. जे आपण डॉक्टरांकडून जाणुन घेणे फार गरजेचे आहे.

Maharashtra Times 9 Jan 2022, 9:45 am
हिंगोली : सध्या जगभरात करोना व्हायरसनं आणि ओमिक्रॉनने जगात थैमान घातलं आहे. ज्या लोकांमध्ये पुरेशी रोगप्रतिकारक क्षमता नाही किंवा ज्यांना मधुमेह किंवा ब्लड प्रेशरसारखे आजार आहेत, अशा लोकांना करोनाची लागण होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे करोनाबद्दल लोकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम giloy benefits ayurveda


काहीजण मात्र घरघुती उपाय करून स्वतःचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोणी गरम पण्याची वाफ तर कुणी गुळवेलचा (giloy )काढा घेत आहेत. गुळवेलाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. गुळवेलच्या पानांमध्ये काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे हे तुमचा सर्दी पासून तर डायबीटीजपर्यंत सर्व आजारांपासून बचाव करतं. तसंच तुमची रोगप्रतिकारक क्षमताही यानं वाढते.

गुळवेल ही एक औषधी वेल मानली जाते. जिच्यात वेगवेगळे रासायनिक घटक आहेत. जसे की ग्लुकोसाईड, गिलोइमन, ग्लूकोसीन, स्टार्च इत्यादी रासायनिक घटक गुळवेलमध्ये आढळुन येत असता, हि वेळ शेतात लिंबाच्या झाडावर आढळून येते.

रुग्णवाढ; मात्र दवाखान्यांवर ताण नाही, सौम्य लक्षणं असल्यामुळे घरीच उपचार
गुळवेलीची पाने ही हृदयाच्या आकाराची, हिरव्या रंगाची असतात. गुळवेलीची साल ही भुरकट रंगाची असते. ती साल काढुन बघितल्यास आतमध्ये हिरव्या रंगाचा भाग दिसतो. त्याचबरोबर गुळवेल जर आपण उभी कापली तर तिचा आतील भाग हा आपल्याला गोलाकार तसेच चक्राकार दिसतो.

गुळवेलाचा काढा बनवण्यासाठी त्याचे एक पान घ्यायचे अणि त्याच्या बारीक - बारीक आकाराच्या चकत्या तयार करायच्या आणि मग त्या स्वच्छ पाण्याने धूवून घ्यायच्या. मग एका पातेल्यात दोन ग्लास पाणी उकळत ठेवावे. त्याच उकळत ठेवलेल्या पाण्यात गुळवेलाच्या चकत्या उकळण्यासाठी टाकाव्या मग ते पाच ते दहा मिनिट उकळून तुम्ही हा काढा रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचा.

गुळवेलाचे जसे आयुर्वैदिक फायदे आहेत. वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे गूळवेलाचे काही दुष्परिणाम देखील आहेत. जे आपण डॉक्टरांकडून जाणुन घेणे फार गरजेचे आहे. जेणेकरून आपल्याला फायदे ऐवजी त्याचा तोटा होऊ नये.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज