अ‍ॅपशहर

कोरोनाच्या धास्तीने अंड्याला अच्छे दिन, रुग्ण वाढताच दरही वाढले!

सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी आहे. अशातच गावठी कोंबड्यांच्या अंड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. एका गावरान अंड्यासाठी २० ते २५ रुपये मोजावे लागत आहेत.

Authored byम. टा. प्रतिनिधी | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 1 Jan 2022, 5:31 pm
विकास दळवी, हिंगोली : सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी आहे. अशातच गावठी कोंबड्यांच्या अंड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. एका गावरान अंड्यासाठी २० ते २५ रुपये मोजावे लागत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eggs rate are incresed due to winter season and Increasing corona patient in maharashtra
अंडी महागली


पूर्वी मोठ्या प्रमाणात गावठी कोंबड्या होत्या. कालांतराने गावठी कोंबड्या कमी झाल्या असून, आता क्वचितच वाड्या-वस्त्यांवर पहायला मिळत आहेत. यामध्ये बॉयलर आणि संकरित कोंबड्याची जात आली असली तरी आजही गावठी कोंबडीलाच मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. ज्यांना गावठी कोंबडी किंवा अंडी खायची ते लोक मिळेल त्या भावाने वाड्या-वस्त्यावर जावून कोंबडया तसंच अंडी खरेदी करताना दिसतात.

अंडी शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक असल्याने थंडीच्या दिवसांत अंडी खाणे शरीरासाठी चांगले असते. अंडी खाल्ल्याने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडिन, झिंक, असे बहुतांशी घटक शरीराला मिळत असतात. मानवी शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व पोषणमूल्य अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्ती राहण्यास मदत होते. त्याचमुळे आहारात नियमितपणे अंडी आवश्यक असल्याचा सल्ला तज्ज्ञ, डॉक्‍टर देत असतात.

दरम्यान, महाराष्ट्रात पुन्हा ओमायक्रोन आणि कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता वाढली असताना कोरोनाबाधित आणि कोरोनामुक्त रुग्णांमध्ये ताकद यावी, यासाठी अंड्यांचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. त्यातच थंडीचे प्रमाण वाढल्याने राज्यात अंड्यांच्या मागणीत झपाट्याने वाढ झाली आहे. अंड्यांची विक्री वाढल्याने दरही तेजीत आहेत. गावरान अंड्यापाठोपाठ बॉयलर अंडीही प्रतिनग ७ /१० रुपयांपर्यंत मिळू लागले आहे. हिंगोली जिल्ह्यात सध्या गावरान अंडी आणि कोंबड्यांसाठी नागरिकांची धाव सध्या वाड्या-वस्त्यांवर पहायला मिळत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज