अ‍ॅपशहर

'शेतकरी देशाचा अन्नदाता, पावसामुळे नुकसान झालेल्यांना आतापर्यंतची सर्वाधिक मदत देणार'

Cm Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईबाबत आश्वासन दिलं असून शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वाधिक मदत देणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2022, 10:01 am
हिंगोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल नांदेड दौऱ्यावर आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यात अनेक बदल झाले. सायंकाळी मुख्यमंत्री नांदेडला पोहोचले. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या नांदेड येथील गोदावरी अर्बन बँकेच्या मुख्य शाखेला त्यांनी भेट दिली आणि नंतर कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे आणि आनंद बोंढारकर यांच्यासह १४ तालुकाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eknath shinde farmer
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईबाबत आश्वासन दिलं आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वाधिक मदत देणार आहे, असं ते म्हणाले. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संजय राठोड, आमदार गोपीकिशन बाजोरीया, माजी खासदार ॲड. शिवाजी माने आदी उपस्थित होते.

मंत्रीमंडळ विस्ताराची लगबग; शिरसाटांना फोन तर राणा पाटील मुंबईला रवाना, सत्तारांचे मात्र तळ्यातमळ्यात

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालं आहे. ठिकठिकाणी नुकसानीची पाहणी केली आहे. देशाच्या अन्नदाता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल.

Ajit Pawar मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, नाराजी दूर करण्यासाठी...

दरम्यान, राज्यातील विविध विभागांमध्ये मोठ्या संख्येने पदे रिक्त असून आगामी काही दिवसांतच ८० हजार पदे भरली जातील. याचबरोबर मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी न्यायालयात तज्ज्ञ वकिलांची फौज उभी केली जाईल. मराठा समाजाला न्याय देण्याचे काम शिवसेना-भाजपा युतीचे सरकार करणार असल्याचे आश्‍वासन एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. तसंच कळमनुरी येथील लमाणदेव तीर्थ क्षेत्र,आदिवासी भवन यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा, तर औंढा नागनाथ व नर्सी नामदेवच्या विकासासाठीही निधी देण्याचं आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

महत्वाचे लेख