अ‍ॅपशहर

धक्कादायक! पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, कारण वाचून पोलिसही हादरले

मृतदेह पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सदरील इसमाचा मृतदेह पोत्यात बांधून पाण्यात फेकले यामुळे, त्याचा चेहरा देखील ओळखणे कठीण झाले आहे.

Maharashtra Times 25 Feb 2022, 6:00 pm
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील पान कनेरगाव ते वाढवणा शिवारात एका शेतातील विहिरीमध्ये पोत्यामध्ये बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सदरील घटना ही आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली तर पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hingoli murder news


घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रंजीत भोईटे यांच्यासह पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. त्याचं बरोबर मृतदेह पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सदरील इसमाचा मृतदेह पोत्यात बांधून पाण्यात फेकले यामुळे, त्याचा चेहरा देखील ओळखणे कठीण झाले आहे.

'ना शिवसेनेचा झेंडा, ना कार्यकर्त्यांची हजेरी'; मालिकांच्या समर्थानातील आंदोलनात बिघाडी
दरम्यान, मृतदेह विहरी बाहेर काढून कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पानकनेरगाव या गावातील एक इसम हरवल्याची तक्रार पोलिस स्थानकात प्राप्त झाली आहे. ओळख पटल्यानंतर तो इसम कोण हे निष्पन्न होईल. तर परिसरात गुप्तधनाच्या माध्यमातून खून झाला असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. अद्याप या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला नसून पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज