अ‍ॅपशहर

'आमचे संसार उघडयावर येत आहेत, तुम्हाला हात जोडून विनंती की....'

हिंगोली तालुक्यातील बोराळा येथील महिलांनी ग्रामीण पोलीस ठाणे येथे धाव घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना गावातली दारु बंद करण्याची हात जोडून विनंती केलीय. महिलांनी दारुबंदीचं निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक यांना दिलंय.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 28 Jan 2022, 8:05 am
हिंगोली : सध्या जिल्ह्यात गाव तिथं दारु अशी परिस्थिती असल्याने, व्यसनांध लोकांची आकडेवारी वाढत चालली आहे. वाढत्या तळीरामांमुळे गावात शांतता नांदत नाहीय. याच साऱ्या प्रकारामुळे असह्य झालेल्या हिंगोली तालुक्यातील बोराळा येथील संतप्त महिलांनी ग्रामीण पोलीस ठाणे येथे धाव घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना गावातली दारु बंद करण्याची हात जोडून विनंती केलीय. महिलांनी दारुबंदीचं निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक यांना दिलंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra hingoli borala Women appeal to police for liquar boycott


हिंगोली तालुक्यातील बोराळा येथील गजानन सखाराम बंदुके, दगडू जळबाजी बनसोडे आणि धोंडूबा पुंजाजी जटाळे हे तिघे जण मागील पाच वर्षांपासून गावात अवैध दारू विक्री करीत असल्याचे महिलांनी पोलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हे तिघे दारू विक्री करीत असल्याची कल्पना महिला मंडळाच्या वतीने हिंगोली येथील ग्रामीण पोलीस ठाण्याला दिलीय एवढंच काय तर राज्य उत्पादन शुल्क विभागाला देखील कळवले. तरीही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

उलट संबधित विभागाला कळवल्यानंतर अजून दारुविक्रीला गती येतेय. त्यामुळे तळीरामाची संख्या वाढत असून, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तर गावात शांतता देखील नांदत नाहीय.

तळीराम हे महिलांकडे देखील वाईट नजरेने बघत असल्याची कैफियत महिलांनी मांडली. रस्त्याने महिला जाताना, तळीराम त्यांना शिवीगाळ तसंच टोमणे मारत असल्याचे देखील महिलांनी सांगितले.

महिलांची कळकळीची विनंती

अनेक संसार उघड्यावर येत असल्याने, महिला वर्ग हैराण झालाय. तळीराम घरातील पैसे चोरुन नेत तसेच हाती पडेल ती वस्तू विकून दारु पित असल्याचा महिलांचं म्हणणं आहे. त्यामुळे दारु विक्री बंद करण्याची कळकळीची विनंती महिलांच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्याकडे केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज