अ‍ॅपशहर

Nagar Election Result Highlights: कुणी जावा-जावा, कुणी सासू-सुना तर कुणी चुलते पुतणे; भावकीतल्या ९ जणांनी विजयाचा गुलाल उधळला!

Sengaon nagar panchayat Election : हिंगोलीच्या सेनगाव नगरपंचायतीमध्ये भावकीतल्या ९ जणांनी विजयाचा गुलाल उधळलाय. देशमुख आडनावाचे हे ९ नगरसेवक निवडून आले आहेत.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 20 Jan 2022, 8:11 am
हिंगोली : राजकारण म्हटलं की सर्वात अगोदर आठवते ती म्हणजे भावकी...! कारण भावकीतला एखादा पुढे जायला लागला की त्याला मागे ओढणारे भावकीतच असतात, याची कित्येक उदाहरणे तुम्ही पाहिली असतील. छोट्या छोट्या गोष्टींवरुन भावकीमध्ये रुसवे-फुगवे बघायला मिळत असतात. त्याचं कारण तितकंच किरकोळ असतं ते म्हणजे मानपान... तो मिळाला नाही की, भावकी आडवी आलीच म्हणून समजा... महाभारतापासून तो आजपर्यंतचा इतिहास आहे. राजकारणात सातत्याने हेच बघायला मिळत असतो. परंतु हिंगोलीच्या सेनगाव नगरपंचायतीमध्ये (Sengaon nagar panchayat Election result) भावकीतल्या ९ जणांनी विजयाचा गुलाल उधळलाय. देशमुख आडनावाचे हे ९ नगरसेवक निवडून आले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Maharashtra Sengaon nagar panchayat Election result 2022 Politics between Deshmukh family 9 carporator


देशमुख गायत्री गजानन, देशमुख यमुनाबाई नारायणराव, देशमुख अंजली आप्पासाहेब, देशमुख मनीषा कैलास, देशमुख शालिनी देविदास, देशमुख राधा श्रीराम, देशमुख ज्योती जगदीशराव, देशमुख ओमप्रकाश प्रल्हादराव, आणि देशमुख निखील भाऊ या ९ नगरसेवकांनी नगर पंचायत निवडणुकीत विजयाला गुलाल उधळलाय. यात कोणी एकमेकांच्या जावा आहेत कुणी सासा-सुना आहेत तर कुणी चुलते पुतणे!

नगर पंचायतीमध्ये १७ उमेदवारांपैकी ०९ नगरसेवक देशमुख आडनावाचे आहेत. आता नगराध्यक्ष कोण होणार, याकडे सेनगावसह जिल्ह्याचं लक्ष लागलंय. नगर पंचायतीचं नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने तसंच १७ नगरसेवकांपैकी १३ महिला असल्याने नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गल्यात पडते, हे पाहणे महत्त्वाचं आहे.

सेनगावच्या निकालाने आचार्य अत्रेंचा तो किस्सा पुन्हा चर्चेत!

महाराष्ट्र विधानसभेमध्ये १९६२ साली चव्हाण आडनावाचे तब्बल ७५ आमदार होते. त्यावेळी फर्डे वक्ते, नेते आचार्य अत्रेंनी एक भाषण केलं होतं. कशाला भानगडी करायच्या, कशाला राजकारण करायचं? आपापसातले वाद मिटवले तर निवडणुका घ्यायचं कामच पडणार नाही, परिणामी पैसा वाचेल आणि समाज सुधारेल

सध्या सेनगाव नगरपंचायतीच्या निकालाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. आपल्याच माणसाशी लढायचं, आपलीच माणसं निवडून तर मग निवडणूकच का लढायची? एकत्र बसून चर्चा करुन पण आपले माणसं निवडू शकत नाही का? असं आचार्य अत्रे म्हणाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज