अ‍ॅपशहर

राज्यात पुन्हा थंडी परतली, गारठ्यापासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारी मध्यानापर्यंत राज्यातल्या अनेक शहरांचं तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवण्यात आला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 24 Jan 2022, 7:46 pm
हिंगोली : जिल्ह्यासह मराठवाडा विदर्भ आणि राज्यात मागील दोन दिवसांपासून थंडीने गाठा वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारी मध्यानापर्यंत राज्यातल्या अनेक शहरांचं तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम once again cold wave in maharashtra hingolikar taking bonfire for protect themselves


मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात आधीच घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांचं तापमान तर ८ ते ९ अंशांपर्यंत खाली आलं आहे. त्यामुळे मराठवाड्यामधल्या हिंगोली जिल्ह्यात नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. तर ऊबदार कपडेही दिवसभर वापरावे लागत आहेत.

अवकाळी पाऊस आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे यंदा राज्यात गुलाबी थंडीचं जरा उशिराच आगमन झालं. पण आता ही थंडी २० फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात कायम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव पुढचे दोन महिने तुम्हाला घेता येणार आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. वाढती थंडी सद्या गहू, हरभरा, पाजीपाला अन्य पिकांना वरदानकारक ठरत आहे. वाढत्या थंडीचा फायदा होणार असल्याचं एकंदरीत शेतकऱ्यांचे मत आहे.

महत्वाचे लेख