अ‍ॅपशहर

पालकांनो आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या, 'या' जिल्ह्यात ३ दिवसांत ३ शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू

मागील तीन दिवसात त्यांचा दुर्दैवी मृत्यूने शोककळा पसरली असून शाळेत विद्यार्थ्यांना पाठवत असताना आपल्या पाल्याची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Maharashtra Times 20 Dec 2021, 2:26 pm
हिंगोली : मागील काही दिवसांपासून वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघाताच्या घटनांत सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहेत. वाहन चालकाचा निष्काळजीपणा हा नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील तीन दिवसांत तीन शालेय विद्यार्थ्यांचा वेगवेगळ्या घटनेमध्ये दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hingoli news (2)


यामध्ये तालुक्यातील कुरुंदा येथून सायकलवर घराकडे जाताना पाचवीच्या वर्गात शिकत असलेल्या संकेत सचिन महाजन वय ११ वर्ष याचा मृत्यु झाला आहे. तर सेनगाव ते हिंगोली रोडवर नरसी येथे हिंगोलीच्या दिशेने कॉलेजला जात असताना भरधाव भरधाव जीपने जांबरून येथील एकनाथ हरिभाऊ जुमडे वय १८ वर्ष याचा जागीच मृत्यू झाला. तर सेनगाव तालुक्यांतील पळशी येथिल सोमनाथ लक्ष्मण वाबळे वय १३ याला सांबळखेडा येथे एका ग्रामसेवकांने भरधाव जीप ने उडविले आहे. यामध्ये सोमनाथ यामध्ये सोमनाथचा जागीच मृत्यू झाला.

राज्याची चिंता वाढली! औरंगाबादचा व्यक्ती ओमिक्रॉन पॉझिटिव्ह, पण....
या प्रकरणी ग्रामसेवक अंगत ज्ञानबा गोरे रा. पळशी यांच्या विरुध्द गोरेगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील तीन दिवसात त्यांचा दुर्दैवी मृत्यूने शोककळा पसरली असून शाळेत विद्यार्थ्यांना पाठवत असताना आपल्या पाल्याची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

महत्वाचे लेख