अ‍ॅपशहर

रोडरोमिओंनी काढली विद्यार्थिनींची छेड, लोकांनी शिकवला चांगलाच धडा, आता आयुष्यात...

Rod Romios molested girl students : हिंगोलीत लोकांनी विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना लोकांनी चांगलाच धडा शिकवला. या रोडरोमिओंनी दुचाकीवरून विद्यार्थिनींच्या बसचा पाठलाग केला. त्यानंतर या रोडरोमिओंनी या विद्यार्थिनींना अश्लील टाँट मारले. मात्र, लोकांनी या रोडरोमिओना बेदम चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी या रोडरोमिओंना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. विनयभंगाचा हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता.

Authored byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Dec 2022, 12:38 am

हायलाइट्स:

  • हिंगोलीत घडला धक्कादायक प्रकार.
  • रोडरोमिओंनी पाठलाग करत केला विद्यार्थिनींचा विनयभंग.
  • रोडरोमिओंना लोकांनी चोप देत घडवील अद्दल.
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम people taught a lesson to rod romios
रोडरोमिओंनी काढली विद्यार्थिनींची छेड
हिंगोली : हिंगोली ते औंढा मार्गावर दिग्रस पाटीजवळ विद्यार्थिनींची छेड करणाऱ्या तीन रोडरोमिओंना जमावाने बेदम झोपले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. बुधवारी, ७ डिसेंबर रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी रोडरोमिओंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथून शाळा व महाविद्यालय सुटल्यानंतर काही विद्यार्थिनी मानव विकास मिशनच्या बसने औंढा नागनाथकडे निघाल्या होत्या. यावेळी लिंबाळा येथून एका दुचाकीवर असलेल्या तीन रोडरोमियोंनी दुचाकी वाहनावरून बसचा पाठलाग सुरू केला. बसजवळ गेल्यानंतर त्यांनी बसमधील विद्यार्थिनींना अश्लील टॉंट मारण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर विद्यार्थिनींनी त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली.

क्लिक करा आणि वाचा- सीमाप्रश्नी हालचालींना वेग, संसदेत पडसाद, दिल्ली पालिकेत आपची सत्ता, भाजप हरला; वाचा, टॉप १० न्यूज

दरम्यान, सदर बस डिग्रस पाटीजवळ पोहोचल्यानंतर विद्यार्थिनी खाली उतरल्या. यावेळी त्या रोडरोमीयोंनी त्यांना छेडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या ठिकाणी जमा झालेल्या जमावाने त्यांना जाब विचारला. त्यानंतर या रोडरोमियोंना बेदम झोडपून काढले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तातडीने अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक आर. एन. मळघने, उपनिरीक्षक केंद्रे, जमादार अशोक धामणे, आकाश पंडितकर, संतोष वाठोरे, मोहम्मद शेख यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दुचाकीवरील तिघांना ताब्यात घेऊन हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर विद्यार्थिनी व जमाव देखील पोलीस ठाण्यात आला.

क्लिक करा आणि वाचा- १३ डिसेंबरला पुणे बंदची हाक; छत्रपती शिवरायांच्या अपमानाचा होणार निषेध, मुस्लीम संघटनांचाही पाठिंबा

मागील चार ते पाच दिवसापासून हा प्रकार सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक पाटील यांनी जमावाला शांत केले. त्यानंतर याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

क्लिक करा आणि वाचा- सीमावादाचे पडसाद संसदेत; खासदार आक्रमक, सभापती ओम बिर्ला यांच्या या विधानाने आश्चर्य
लेखकाबद्दल
सुनील तांबे
सुनील तांबे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सी न्यूज, ईटीव्ही मराठी वृत्तवाहिनी या वाहिन्यांमध्ये प्रतिनीधी आणि वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे, तसेच मुंबई सकाळ या वृत्तपत्रात मंत्रालय प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. त्याच प्रमाणे आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीत असोसिएट एडिटर म्हणून आणि मी मराठी या वृत्त वाहिनीत असोसिएट एडिटर म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांनी युवर स्टोरी या डिजिटल मीडियात वरिष्ठ कंटेट प्रोड्युसर म्हणूनही काम पाहिले आहे. सुनील तांबे हे २०१५ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये आजतागायत कार्यरत आहेत. सुनील तांबे यांना इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि डिजिटल मीडियात गेल्या २३ वर्षांपासून कार्यरत आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख