अ‍ॅपशहर

आई-वडिलांना दाखवलेलं स्वप्न पूर्ण झालं नाही, हिंगोलीतील तरुणाने पुण्यात आयुष्य संपवलं...

Hingoli News: गेल्या तीन, चार वर्षात त्याने अनेक भरत्या दिल्या होत्या. मात्र, यामध्ये त्याला यश मिळाले नाही. आपण, आई-वडिलांना दाखवलेलं स्वप्न पूर्ण करु शकलो नाही, आता गावाकडे कोणते तोंड घेऊन जावे. याच नैराश्यातून युवकाने आई-वडिलांच्या नावे एक चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. मृत तरुणाच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

| Edited byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Oct 2022, 12:51 pm
हिंगोली: आज देशात शासकीय नोकर भरत्या ठप्प झाल्याने लाखो करोडो मुलं शिकूनही बेरोजगार आहेत. तर, ग्रामीण भागातील शिकलेल्या मुलांच्या हाताला काम मिळत नसल्याने अनेक सुशिक्षित तरुण मुलं नोकरीचं स्वप्न उराशी बाळगून शहराकडे धाव घेत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Hingoli News
नोकरी न मिळाल्याने नैराश्य, आई-पप्पा, दादा मला माफ करा, चिठ्ठी लिहून तरुणाचं धक्कादायक पाऊल


मात्र, शहरात जाऊन सुध्दा बाळगलेले स्वप्न पूर्ण होत नसल्याने या नैराश्यातून अनेक तरुण आपले जीवनच संपवून टाकत असल्याच्या घटना घडत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील देऊळगाव जहाँ येथील सुशिक्षित युवकाने आपल्या आई-वडिलांना दाखवलेले स्वप्न पूर्ण न करता आल्याने पुणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दिवाळी सणाच्या एक दिवस अगोदर रविवारी (२३ ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास घडली आहे.

हेही वाचा -धक्कादायक! बसवलिंग स्वामी त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळले, वर्षभरात मठाच्या दुसऱ्या गुरुचा मृत्यू

मृत देऊळगाव जहाँ येथील रामेश्वर भारत कांबळे (वय २३ वर्ष) हा युवक आपल्या घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने बारावी पास होऊन पुणे या ठिकाणी कंपनीत काम करत शिक्षण आणि सोबतच पोलीस, आर्मी भरतीची तयारी करत होता.

गेल्या तीन, चार वर्षात त्याने अनेक भरत्या दिल्या होत्या. मात्र, यामध्ये त्याला यश मिळाले नाही. आपण, आई-वडिलांना दाखवलेलं स्वप्न पूर्ण करु शकलो नाही, आता गावाकडे कोणते तोंड घेऊन जावे. याच नैराश्यातून युवकाने आई-वडिलांच्या नावे एक चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. मृत तरुणाच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा -धनत्रयोदशीला महाराष्ट्राला मुघलकालीन खजिना सापडला, खड्डा खोदताना घबाड हाती

नेमके काय लिहले चिठ्ठीमध्ये

आई-पप्पा, दादा मला माफ करा. मी तुम्हाला दाखविलेलं स्वप्न पूर्ण करु शकलो नाही. मला आता पुढचा रस्ता दिसत नसल्याने हाच मला शेवटचा पर्याय वाटत आहे. माझ्यामुळे कुणाचे मन दुखावले गेले असल्यास मी सर्वांची माफी मागतो मला माफ करा. सॉरी... अशा आशयाची चिठ्ठी गळफास घेतलेल्या ठिकाणी आढळून आली.

महत्वाचे लेख