अ‍ॅपशहर

जळगावात संक्रातीला १३१ स्वच्छता रॅली

जळगाव महापालिकेकडून संक्रातीला शनिवारी (दि. १४) विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेचे प्रबोधन करणाऱ्या १३१ रॅली काढण्यात येणार आहे. यात शहरातील १३१ शाळांमधील १३४२ शिक्षक आणि ४२,७८० विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली.

Maharashtra Times 13 Jan 2017, 4:00 am
जळगाव ः जळगाव महापालिकेकडून संक्रातीला शनिवारी (दि. १४) विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेचे प्रबोधन करणाऱ्या १३१ रॅली काढण्यात येणार आहे. यात शहरातील १३१ शाळांमधील १३४२ शिक्षक आणि ४२,७८० विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 131 rallies on makar sankranti at jalgaon
जळगावात संक्रातीला १३१ स्वच्छता रॅली


स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी, स्वच्छतेचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहचावा यासाठी स्वच्छता प्रबोधन रॅली काढण्यात येत आहे. शनिवारी, सकाळी ९ ते १० या कालावधीत रॅली राहिल. ज्या परिसरात शाळा असेल, त्याच परिसरात शाळेतील विद्यार्थी स्वच्छतेच्या संदेशाचे फलक घेऊन जनजागृती करणार आहेत. १३१ शाळांच्या मुख्याध्यापकांशी याबाबत चर्चा झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज