अ‍ॅपशहर

चाळीसगावात पंधरा नवीन सजानिर्मिती

वाढती लोकसंख्या व वाढते नागरिकीकरण या अनुषंगाने क्षेत्रीय महसूल यंत्रणेच्या कामात वाढ झाली आहे. वाढत्या कामाचा बोजा लक्षात घेऊन तालुक्यात नवीन वाढीव तलाठी सजांची संख्यावाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार नाशिक विभागीय आयुक्तांनी तशी अधिसूचना काढली आहे. त्यानुसार तालुक्यात १५ नवीन तलाठी सजे वाढणार आहेत.

Maharashtra Times 29 Aug 2017, 4:00 am
म.टा. वृत्तसेवा, चाळीसगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 new talathi offices in chalisgaon taluka
चाळीसगावात पंधरा नवीन सजानिर्मिती

वाढती लोकसंख्या व वाढते नागरिकीकरण या अनुषंगाने क्षेत्रीय महसूल यंत्रणेच्या कामात वाढ झाली आहे. वाढत्या कामाचा बोजा लक्षात घेऊन तालुक्यात नवीन वाढीव तलाठी सजांची संख्यावाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार नाशिक विभागीय आयुक्तांनी तशी अधिसूचना काढली आहे. त्यानुसार तालुक्यात १५ नवीन तलाठी सजे वाढणार आहेत.

गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून चाळीसगाव तालुक्यातील तलाठी सजांची रचना व नवीन सजांची निर्मिती झालेली नव्हती. त्यामुळे नागरिकांना आडवळणी, वाहतूक व्यवस्था नसलेल्या गावातील तलाठी कार्यालयात जावे लागायचे. तसेच काही गावे मोठी असूनदेखील तेथे तलाठी सजा नव्हती. तसेच शासनानेदेखील याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. आमदार उन्मेश पाटील आणि तहसीलदार कैलास देवरे यांनी या विषयात लक्ष देऊन सूचना जाणून घेतल्या. यामध्ये चाळीसगाव २, चाळीसगाव ३, न्हावे, करजगाव, नांद्रे, कुंझर, दहिवद, चिंचखेडे, करगाव, जामडी प्र. ब., लोंजे, बाणगाव, हिरापूर, विष्णुनगर, टाकळी प्र. दे. यांचा समावेश आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज