अ‍ॅपशहर

आईला चहाच्या टपरीवर सोडलं, अंघोळीसाठी घरी परतला अन् मग त्याने जे केलं... जळगाव सुन्न

Jalgaon News: जळगावात एका १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्याने ही आत्महत्या का केली याबाबत सध्या काहीही माहिती नाही.

| Edited byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 May 2023, 4:55 pm
जळगाव: जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीतील १९ वर्षीय तरुणाने सकाळी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. आकाश सुरेश शेरे (वय-१९ रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव), असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समोर आलेले नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Jalgaon boy commit suicide


जळगावातील सुप्रीम कॉलनीत आकाश शेरे हा आई सविता आणि लहान भाऊ दीपक यांच्यासोबत वास्तव्याला होता. आकाश हा एमआयडीसी परिसरात चहाची टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजता आकाशने त्याच्या आईला चहाच्या टपरीवर सोडून तो परत घरी अंघोळ करण्यासाठी आला. यादरम्यान त्याने राहत्या घरात छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Crime News: पत्नी, काकू, वहिनी आणि माहेरी आलेल्या बहिणीला संपवलं, घटनेने सारं गाव दहशतीत
मुलगा टपरीवर आला नाही म्हणून आई घरी गेली अन् मुलाला पाहून तिने हंबरडाच फोडला

आकाश हा टपरीवर का आला नाही म्हणून आई सविता या घरी आल्या. घरात जाताच आकाश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला पाहून आईने एकच हंबरडा फोडला होता. आईने आरडाओरड केल्यानंतर शेजारी राहणारे नागरिक आणि तरुणांनी धाव घेतली. तसेच, मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला.


याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणीअंती मयत घोषित केले. आकाशने आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. मृत आकाश याच्या पश्चात आई सविता, भाऊ दीपक आणि दोन विवाहित बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

महत्वाचे लेख