अ‍ॅपशहर

स्ट्राँगरूमवर २६ सीसीटीव्हींची ‘नजर’

जळगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गोदामामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रभागानुसार मतदान यंत्र, साहित्यासाठी स्ट्राँगरूम तयार केले आहे. या रूमवर २६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर आहे. लाइव्ह रेकॉर्डिंग हे मुख्य निवडणूक अधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच अन्य प्रमुख अधिकाऱ्यांना दिसत आहे.

Maharashtra Times 29 Jul 2018, 5:00 am
मनपा मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 cctv watch on municipal corporation strongroom
स्ट्राँगरूमवर २६ सीसीटीव्हींची ‘नजर’


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गोदामामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रभागानुसार मतदान यंत्र, साहित्यासाठी स्ट्राँगरूम तयार केले आहे. या रूमवर २६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर आहे. लाइव्ह रेकॉर्डिंग हे मुख्य निवडणूक अधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच अन्य प्रमुख अधिकाऱ्यांना दिसत आहे.

महापालिकेच्या निवडणूक तयारी ही मतदान तसेच मतमोजणी पर्यंतची ही तयारी पूर्ण झाली आहे. त्यानुसार दि. १ ऑगस्टला मतदान प्रक्रिया होणार असून, १९ प्रभागांतील ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी शहरात ४६९ मतदान केंद्रे असून, ६ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिलेल्या प्रभागानुसार मतदान केंद्र, साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र्य व्यवस्था केली आहे. त्यानुसार सहा स्ट्राँग रूम तयार केले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच रूमच्या सुरक्षेसाठी मनपा प्रशासनाने आतमध्ये व बाहेर २६ सीसीटीव्ही कॅमेरा लावले आहे.

तगडा पोलिस बंदोबस्त
मतदान साहित्य तसेच मतमोजणी ही औद्योगिक वसाहतीमधील ई-८ मध्ये होणार आहे. दोन गोदामांपैकी एका गोदाम साहित्य ठेवण्यासाठी केले असून, दोन्ही गोदामाची सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरासोबत तगडा पोलिस बंदोबस्त लावलेला आहे. मतदान साहित्य ठेवण्याच्या स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी २६ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. सर्वांचे चित्रीकरण हे थेट निवडणुकीचे प्रमुख अधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांच्या मोबाइल जोडले गेले आहे. त्यामुळे सूक्ष्म हालचालीवरदेखील अधिकाऱ्यांची २४ तास नजर राहणार आहे.

मतमोजणी केंद्रावर तीस सीसीटीव्ही
१ ऑगस्टला मतदान प्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्या गोदामात तयार केलेल्या मतमोजणी होणार आहे. येथेदेखील ३० सीसीटीव्ही कॅमेरे गोदामात व बाहेर बसविले जाणार आहेत. त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेवरदेखील कॅमेऱ्याद्वारे करडी नजर राहणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज