अ‍ॅपशहर

जळगावात दसऱ्याला ३५ फुटी रावणदहन

जळगावात दरवर्षाप्रमाणे यंदा देखिल एल.के.फाउंडेशनतर्फे विजयादशमी निमित्त (दि.३०) शनिवारी ३५ फुटी रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. मेहरुण तलाव चौपाटीवर संध्याकाळी ६:३० वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष व महापौर ललित कोल्हे यांनी दिली आहे.

Maharashtra Times 28 Sep 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 35 feet of ravana in jalgaon district on vijyadashmi
जळगावात दसऱ्याला ३५ फुटी रावणदहन

जळगावात दरवर्षाप्रमाणे यंदा देखिल एल.के.फाउंडेशनतर्फे विजयादशमी निमित्त (दि.३०) शनिवारी ३५ फुटी रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. मेहरुण तलाव चौपाटीवर संध्याकाळी ६:३० वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष व महापौर ललित कोल्हे यांनी दिली आहे.

विजया दशमीनिमित्त जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते रावण दहन करण्यात येणार आहे. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेश जैन, खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे आदींची उपस्थिती असणार आहे. यंदाच्या रावणाची प्रतिकृती शेख भिका शेख अजीज व त्यांचे कारागीर तयार करीत आहेत. रावणाच्या प्रतिकृती ची उंची ३५ फुट असणार आहे. यावेळी दरवर्षीप्रमाणे लाखो

रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज