अ‍ॅपशहर

५६० इच्छुकांची उमेदवारीसाठी कसोटी

जिल्हा परिषदेसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी शनिवारी (दि. २१) भाजप कार्यालयात निवड समितीने मुलाखती घेतल्यात. जळगाव ग्रामीणसह आठ तालुक्यांसाठी सुमारे ५६० इच्छुकांची उमेदवारीसाठी आज कसोटी लागली. पक्षातील योगदान व निवडून येण्याची क्षमता याची चाचपणी समितीकडून केली जात होती. इच्छुकांच्या गर्दीमुळे भाजप कार्यालयाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Maharashtra Times 22 Jan 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 560 intrested candidate for congress nationalist congress party
५६० इच्छुकांची उमेदवारीसाठी कसोटी


जिल्हा परिषदेसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी शनिवारी (दि. २१) भाजप कार्यालयात निवड समितीने मुलाखती घेतल्यात. जळगाव ग्रामीणसह आठ तालुक्यांसाठी सुमारे ५६० इच्छुकांची उमेदवारीसाठी आज कसोटी लागली. पक्षातील योगदान व निवडून येण्याची क्षमता याची चाचपणी समितीकडून केली जात होती. इच्छुकांच्या गर्दीमुळे भाजप कार्यालयाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

जळगावातील जिल्हा भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात जळगाव लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांच्या गट व गणांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या वेळी निवड समितीमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन, अध्यक्ष उदय वाघ, आमदार उन्मेश पाटील, खासदार ए. टी. पाटील, आमदार स्मिता वाघ, किशोर काळकर, माजी मंत्री एम. के. पाटील, आमदार चंदुलाल पटेल, सदाशिव पाटील आदी नेते मुलाखती घेत होते. दुपारी १२ वाजता पारोळा तालुक्यातील गटा व गणांपासून मुलाखतींना सुरुवात करण्यात आली.

९९ जागांसाठी पाचपट इच्छुक

जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव ग्रामीण, पारोळा, एरंडोल, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव व अमळनेर या तालुक्यांतील ३३ गट व ६६ गणांसाठी सुमारे ५६० इच्छुक उपस्थित होते. तसेच आठ पंचायत समित्यांसाठी देखील इच्छुकांची गर्दी होती.

इच्छुकांची कसोटी

इच्छुकांना मुलाखतीदरम्यान सर्व निकषानुसार चाचपणी करण्यात येत होती. सामाजिक कार्य, पक्षनिष्ठा, पक्षातील योगदान, उमेदवारीचा अनुभव व तयारी तसेच निवडून येण्याची खात्री व क्षमता याबाबत प्रश्न विचारून माहिती घेण्यात येत होती.रावेर लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच शनिवारी (दि. २१) देखील जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी महिलांचा चांगला प्रतिसाद होता. सकाळपासूनच भाजप कार्यालयात इच्छुक व त्यांच्या समर्थकांची गर्दी झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत मुलाखती सुरू होत्या.

तालुकानिहाय इच्छुक

जळगाव ग्रामीण (७०), पारोळा (३०), एरंडोल(४५), पाचोरा (८०), भडगाव (४०), चाळीसगाव(१०५), धरणगाव(४०) व अमळनेर (७०)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज