अ‍ॅपशहर

एटीएममधून ६ लाख लुटले

राष्ट्रीय महामार्गावर जळगाव ते नशिराबाद दरम्यान तरसोद फाट्याजवळ एचडीएफसी बँक शाखा व एटीएम आहे. रविवारी (दि. १९) पहाटे पाच दरोडेखोरांनी येथील सुरक्षारक्षकाला मारहाण करीत बांधून ठेवले.

Maharashtra Times 20 Nov 2017, 4:00 am
गॅस कटरच्या सहाय्याने तरसोद फाट्यावरील बँकेत दरोडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 lakh looted from the atm at tarsod fata jalgaon taluka
एटीएममधून ६ लाख लुटले


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

राष्ट्रीय महामार्गावर जळगाव ते नशिराबाद दरम्यान तरसोद फाट्याजवळ एचडीएफसी बँक शाखा व एटीएम आहे. रविवारी (दि. १९) पहाटे पाच दरोडेखोरांनी येथील सुरक्षारक्षकाला मारहाण करीत बांधून ठेवले. त्यानंतर शक्तिशाली गॅस कटरने एटीएम मशिन कापून काढत त्यातील ६ लाख ३० हजार रुपयांची कॅश लूटून नेली आहे. पहाटे २.१० ते ४.४५ वाजे दरम्यान झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

जळगाव शहराजवळून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील महामार्गावर तरसोद फाट्याजवळ रस्त्याला लागूनच एचडीएफसी बँकेची छोटी शाखा आहे. या शाखेला लागूनच एटीएम आहे. याठिकाणी शनिवारी (दि. १८) रात्री हर्षल सुभाष चौधरी (वय २३, रा. जुने जळगाव) हा ड्युटीला होता. पहाटे २ वाजून दहा मिनिटांनी एटीएममध्ये मागील बाजूने चेहरा दिसू नये, अशा पद्धतीने फडके बांधून पाचजण आत घुसले. सर्वांच्या हातात रॉड होते. त्यांनी हाफ पॅन्ट घातल्या होत्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज