अ‍ॅपशहर

'५० खोके, एकदम ओके': गुलाबराव पाटलांकडून महाविकास आघाडीच्या हातात आयतं कोलीत? VIDEO व्हायरल

Gulabrao Patil Video : गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाला लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे.

| Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Aug 2022, 6:56 pm
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेना आमदारांवर बंडासाठी पैसे घेतल्याचा आरोप करत '५० खोके, एकदम ओके' अशी घोषणा महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे. या घोषणेमुळेच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मोठा राडाही झाला होता. मात्र आता शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांनीच जाहीर व्यासपीठावरून या घोषणेचा उल्लेख करत मिश्किल टिपण्णी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gulabrao patil video २
गुलाबराव पाटील


जळगाव लेवा समाजाचा गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, 'व्यासपीठावर माझ्या एका बाजूला भाजपचे आमदार बसले आहेत, तर दुसऱ्या बाजूला '५० खोके आणि एकदम ओके' म्हणजेच मी बसलो आहे. मोकळं सांगून दिलेलं बरं..बाकी कोणी सांगण्यापेक्षा मीच आज मी सांगून टाकतो,' असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.



दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी हे वाक्य उच्चारताच उपस्थितांमध्ये चांगलाच हास्यकल्लोळ माजला. पाटील यांच्या वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाला लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख