अ‍ॅपशहर

‘झेंडूची फुले’तून उलगडला ग्रामीण जीवनपट

परिवर्तन महोत्सवात बुधवारी (दि. २४) सायंकाळी सादर झालेल्या ‘झेंडूची फुले’ या साहित्यकृतीच्या अभिवाचनातून रंगकर्मींनी संपूर्ण ग्रामीण जीवनपट उलगडला. यात शेती व शेतकऱ्यांच्या समस्यांचादेखील ऊहापोह करण्यात आला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Sep 2019, 5:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम abhivachan festival by parivartan team at jalgaon
‘झेंडूची फुले’तून उलगडला ग्रामीण जीवनपट


परिवर्तन महोत्सवात बुधवारी (दि. २४) सायंकाळी सादर झालेल्या ‘झेंडूची फुले’ या साहित्यकृतीच्या अभिवाचनातून रंगकर्मींनी संपूर्ण ग्रामीण जीवनपट उलगडला. यात शेती व शेतकऱ्यांच्या समस्यांचादेखील ऊहापोह करण्यात आला.

पाचव्या परिवर्तन अभिवाचन महोत्सवात बुधवारी (दि. २४) विरेंद्र पाटील लिखित व दिग्दर्शित ‘झेंडूची फुले’ या साहित्य कृतीचे अभिवाचन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप जोशी, सुचिता पाटील तसेच नाट्यकर्मी-समीक्षक विजय पाठक उपस्थित होते.

ग्रामीण भागातील शेती करणाऱ्या समूहाला आर्थिक संकट तर आहेच, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे शेतीच्या ऱ्हासाचे लक्षण आहे. पण आर्थिकच कारण याला जबाबदार नाहीतर सामाजिक दृष्ट्यादेखील शेतीला प्रतिष्ठा नाही. त्यामुळे शेती करणाऱ्या तरुण मुलांची लग्न हा गंभीर प्रश्न आहे. जळगाव जिल्ह्यातील कृषी संस्कृतीत काम करणाऱ्या तरुणांना अगदी बाहेरून आदिवासी समाजातील मुली लग्नासाठी आणाव्या लागतात. कारण, शेतीत काम करणाऱ्या मुलाला शेतकरीसुद्धा मुली देत नाहीत.

लग्नाळू मुलगा तुषार जोशी याने हूबेहूब उभा केला. मुकुंद महाजन, अजय पाटील, रितेश वानखेडे व भारती वैष्णव यांनी समरस होऊन अभिवाचन केले. विरेंद्र पाटील आणि संजीवनी यांच्या लेवागण, वऱ्हाडी बोलीतील हलक्याफुलक्या विनोदांनी रसिकांना खळखळून हसवले, खिळवून ठेवले. अभिवाचनाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अभिवाचनाची प्रकाश योजना नितीश पाटील, संगीत मानसी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे मनोज पाटील यांनी केले. महोत्सवस्थळी निर्माण करण्यात आलेला अभिवाचनाचा सेल्फी पाईंट प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज