अ‍ॅपशहर

स्नेहलता रुपवते यांचा अपघाती मृत्यू

रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी स्नेहजा उर्फ स्नेहलता प्रेमानंद रुपवते यांचा पाळधीजवळ चारचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी (दि. १२) स्नेहलता रुपवते या कुटुंबासह मुंबईकडे जाण्यासाठी चारचाकीतून निघाल्या होत्या.

Maharashtra Times 13 May 2019, 9:17 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम accidental death of snehlata rupwate
स्नेहलता रुपवते यांचा अपघाती मृत्यू


रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी स्नेहजा उर्फ स्नेहलता प्रेमानंद रुपवते यांचा पाळधीजवळ चारचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी (दि. १२) स्नेहलता रुपवते या कुटुंबासह मुंबईकडे जाण्यासाठी चारचाकीतून निघाल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजेच्यादरम्यान पाळधीजवळ त्यांच्या चारचाकीचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तीन ते चार पलट्या घेत चारचाकी रस्त्याच्या कडेला फेकली गेली. या अपघातात स्नेहलता प्रेमानंद रुपवते यांच्या जागीच मृत्यू झाला तर तर चालकासह त्यांच्या कुटुंबातील सहा जण जखमी झाले. त्यांच्यावर उद्या (दि. १४) सकाळी १० वाजता खिरोदा येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. या चारचाकीवर समोरून येणारी दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वारदेखील ठार झाला. तर दुचाकीवरील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

स्नेहजा उर्फ स्नेहलता प्रेमानंद रुपवते या माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी होत्या. अपघातात वासुदेव दशरथ माळी (वय २८, रा.आसोदा) हा दुचाकीस्वार ठार झाला तर दुचाकीवरील दुसरा तरुण चेतन लक्ष्मण पाटील (वय २३, रा. आसोदा) हा गंभीर जखमी आहे. चारचाकीमध्ये बसलेले मुलगी उत्कर्षा प्रशांत सैलानी (वय २८), त्यांचे पती प्रशांत सैलानी (वय ४१) मुलगा साहस (वय ३), दुसरी मुलगी बंधमुक्ता खान (वय ४१), त्यांची मुलगी उन्मीद (वय १३) व चारचाकी चालक अश्पाक शेख (वय ३२, सर्व रा. मुंबई) हे जखमी झाले आहेत. माजी आमदार चौधरी यांची मुलगी यज्ञा हिचा शनिवारी (दि. ११) खिरोदा येथे विवाह सोहळा पार पडला. या लग्नसमारंभासाठी त्यांच्या भगिनी स्नेहलता या दोन मुली, जावई व नातवंडांसह खिरोद्याला आल्या होत्या. दरम्यान, रविवारी सकाळी मुंबईला जाण्याअगोदर हे सर्वजण मुक्ताईनगर येथे मुक्ताई मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेथून दुपारी त्यांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पाळधी जवळील साई मंदिरासमोर उष्णतेमुळे त्यांच्या चारचाकीचे टायर फुटले. यामुळे चारचाकी तीन पलट्या घेत रस्त्याच्या कडेला गेली. दरम्यान, याचवेळी या चारचाकीच्या समोरुन दुचाकीवरुन (एमएच १९, ६८२५) वासुदेव माळी व चेतन पाटील हे दोघे येत होते. त्यांची दुचाकी पलट्या घेत असलेल्या चारचाकीस धडकली. यामुळे दोघे गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना वासुदेव यांचा मृत्यू झाला. दरम्यान, वासुदेव माळी याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर दीड तास त्यांच्यावर उपचारच झाले नाहीत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा असा आरोप आसोदा ग्रामस्थांनी केला. वासुदेव मृत झाल्यानंतर ग्रामस्थांचा संताप अनावर झाला होता. जिल्हापेठ पोलिसांनी रुग्णालयात येऊन गर्दीवर नियंत्रण मिळवले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज