अ‍ॅपशहर

बालकांच्या ‘आधार’चे मोठे आव्हान

शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एक लाख मुलामुलींचे आधारकार्ड काढणे अद्यापही बाकी असून, या मुलांची यादी उपलब्ध होत नसल्याने त्यांची नोंदणी करून त्यांना आधार देणे हे प्रशासनासमोरील आव्हानात्मक काम बनले असल्याचे प्रकल्प संचालक प्रमोद बोरोले यांनी सांगितले.

Maharashtra Times 2 Aug 2016, 2:31 pm
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम adhar card for kids
बालकांच्या ‘आधार’चे मोठे आव्हान


जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एक लाख मुलामुलींचे आधारकार्ड काढणे अद्यापही बाकी असून, या मुलांची यादी उपलब्ध होत नसल्याने त्यांची नोंदणी करून त्यांना आधार देणे हे प्रशासनासमोरील आव्हानात्मक काम बनले असल्याचे प्रकल्प संचालक प्रमोद बोरोले यांनी सांगितले. त्यामुळेच ही मुले कुठून शोधून काढायची? अशा पेचात प्रशासन सापडले आहे.

जळगाव जिल्ह्यात अद्याप एक लाख मुलेमुली ही आधार कार्डविना आहे. ती बालवाडी वा प्राथमिक शाळेत शिकणारी आहेत. पण, त्यांची यादी कोठेही उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांचे आधार करणे हे आव्हान आहे. प्रशासन स्तरावर ही मुले शोधण्याचे काम सुरू आहे. ज्या पालकांनी अद्याप आपल्या मुलांचे आधार काढले नसेल, तर त्यांनी तत्काळ आधार नोंदणी केंद्रावर जाऊन आधार काढण्याचे आवाहन प्रमोद बोरोले यांनी केले आहे. जिल्ह्यात सध्या १४२ आधार नोंदणी केंद्रे सुरू असून, जळगाव शहरात १६ नोंदणी केंद्रे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

सन २०१५ नुसार जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या ४४ लाख ७४ हजार असून, यापैकी ४० लाख ८५ हजार लोकसंख्येची म्हणजेच ९२.४ टक्के आधार नोंदणी झालेली असल्याचे प्रमोद बोरोले यांनी स्पष्ट केले. आधार नोंदणी १०० टक्के होण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, आतापर्यंत ४४ लाख ७४ हजारपैकी ४० लाख ८५ हजार जणांनी आपले आधार कार्ड काढले आहेत. आता उर्वरीत ३ लाख ८० हजार जणांचे आधार काढणे बाकी अशी माहिती बोरोले यांनी दिली. दरम्यान, आधार कार्डला मोबाइल नंबर जोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

आव्हानात्मक काम

० ते ५ या वयोगटांत ३ लाख ५० हजार बालकांपैकी ६० हजार शहरी आणि ग्रामीण बालकांचे आधार्ड कार्ड काढणे बाकी आहे.

६ ते १८ वयोगटांत ८ लाख ४० हजार विद्यार्थी येतात. यापैकी ६ लाख ७० हजार जणांचे आधार काढून झालेले आहे. त्यांच्यापैकी २.३० लाख शिल्लक आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज